
Rishi Kapoor : गर्लफ्रेंडसाठी नीतूंकडूनच लिहून घ्यायचे प्रेमपत्र!
हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर घराणं आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे… त्यांच्याच घरातील एक महत्वाचं नाव म्हणजे ऋषी कपूर (Rishi Kapoor)…. आपल्या सहस सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात तर घर केलं… एकीकडे पिक्चर्स सुपरहिट सुरु असताना दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक जीवनही वेगवेगळ्या वळणांवरुन जात होतं… नीतु सिंग (Neetu Singh) आणि ऋषी कपूर यांच्यातील प्रेम बहरण्याआधी तुम्हाला माहित आहे का ऋषी कपूर त्यांच्या गर्लफ्रेंडसाठी नीतू सिंग यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचे… काय होता किस्सा जाणून घेऊयात…

ऋषी कपूर आणि नीतू सिंग या सदाबहार जोडप्याची पहिली भेट आरके स्टुडिओमध्ये झाली होती, जिथे ‘बॉबी’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं… पण ‘जहरीला इंसान’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची चांगली ओळख झाली. त्यावेळी नीतू यांचं वय फक्त १५ वर्ष होतं… नीतू यांच्यासोबत रिलेशनमध्ये येण्याआधी ऋषी कपूर यांचे यास्मिन मेहता या पारसी मुलीवर प्रेम होतं… ऋषी यांनी यास्मिनबद्दल फार काही सांगितले नव्हतं पण त्यांनी नीतूला पहिल्या भेटीत यास्मिनला डेट करत असल्याचं सांगितलं होतं… असं देखील सांगितलं जात होतं की जेव्हा ऋषी यांचे यास्मिनशी भांडण झाले तेव्हा ऋषी नीतूला शांत करण्यासाठी पत्र लिहायला लावायचे.(Bollywood Gossips)
====================================
हे देखील वाचा : ऋषी कपूर होता ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरचा डाय हार्ड फॅन!
====================================
मात्र, ऋषी यांचे यास्मिनसोबतचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. यास्मिन आयुष्यातून निघून गेल्यानंतर ऋषी कपूर यांच्या मनात नीतूंबद्दल प्रेम निर्माण झाले आणि हळूहळू त्यांच्यात जवळीकता वाढू लागली… मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ऋषी कपूर-नीतू सिंग यांनी १९८० मध्ये लग्नगाठ बांधली….(Rishi Kapoor marriage)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi