Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

खुल्लमखुल्ला ऋषी कपूर!

 खुल्लमखुल्ला ऋषी कपूर!
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

खुल्लमखुल्ला ऋषी कपूर!

by धनंजय कुलकर्णी 25/04/2021

चित्रपटातील कलावंत ज्यावेळी आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे आत्मचरित्र लिहितात; त्या प्रत्येक वेळी आत्मचरित्रामध्ये सर्व कथन प्रामाणिकपणाने केलेले असतेच असे नाही. परंतु काही कलाकार मात्र आपल्याकडून कळत-नकळतपणे झालेल्या चुकांची कबुली देतात. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी त्यांच्या ‘खुल्लमखुल्ला’ या आत्मचरित्रात अशीच एक कबुली दिली होती. त्याचाच हा किस्सा.

ऋषी कपूर राज कपूर यांचे द्वितीय सुपुत्र! रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून झाला. या चित्रपटात त्यांनी बालपण आणि तारुण्य या मधल्या अडनिड्या वयाच्या मुलाची अतिशय सुंदर अशी भूमिका केली होती. पौगंडावस्थेतील प्रेम ऋषी कपूरने फार सुंदर रीतीने दाखवले होते. या प्रसंगात त्याच्यासोबत अभिनेत्री सिमी गरेवाल होती. विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील नाजूक नात्याचा वेध राज कपूर यांनी फार सुंदर रीतीने घेतला होता. ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे तर या टेकिंगवर इतके खुश झाले होते त्यांनी राजकपूर सुचवले होते, ‘मेरा नाम जोकर’च्या सुरुवातीच्या या कोवळ्या वयातील प्रेम कहाणीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर पडद्यावर आणले तर जगावेगळी एक अनोखी प्रेम कहानी होईल! अर्थात राज कपूर यांनी तसे केले नाही पण ‘टीनएज लव्ह स्टोरी’ हा विषय त्यांच्या डोक्यात फिट्ट झाला. अतिशय मनापासून बनवलेला त्यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला. करोडो रुपयांचे नुकसान झालं त्यामुळे त्यांचा आर के स्टुडिओ गहाण ठेवावा लागला.

Bollywood actor Rishi Kapoor
Bollywood actor Rishi Kapoor

त्याच्यापाठोपाठ आलेला ‘कल आज और कल’ हा चित्रपट रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपटदेखील बर्‍यापैकी बनला होता पण भारत-पाकिस्तानचे १९७१ सालचे युद्ध झाल्याने, त्या वर्षी रात्रीचा शो सर्व देशभर बंद असल्यामुळे या सिनेमाला देखील अपयशाला सामोरे जावे लागले. या चित्रपटात रणबीर कपूरला सहाय्यक म्हणून ऋषी कपूर याने दिग्दर्शनात साथ दिली होती. यानंतर राज कपूर यांच्यापुढे आरपारची लढाई होती. त्यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे होते आणि त्यातूनच ‘बॉबी’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया हि तरुण फ्रेश जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पहिल्यांदाच शंकर-जयकिशन यांची साथ सोडून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना आर के कॅम्पसमध्ये आणले होते. त्यांची गाणीदेखील तुफान लोकप्रिय ठरली होती.

१९७३ साली  राज कपूरच्या ‘बॉबी’ ने मोठा तहलका निर्माण करून प्रचंड असे यश मिळवले होते. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर यांचे वय अवघे २१ वर्ष होते. (जन्म ४ सप्टेंबर १९५२) चित्रपट प्रदर्शित झाला हिट झाला आणि नाही म्हटलं तरी ऋषी कपूरच्या डोक्यात यशाची हवा गेली होती. चित्रपटाला लोकमान्यता लावली होती आता त्याला राजमान्यता हवी होती. त्यावेळी फिल्मफेअर पुरस्काराची मोठी हवा असायची. आपल्याकडचे ऑस्करच त्याला समजले जायचे! याच काळात ऋषी कपूर यांना एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने “तुम्ही मला तीस हजार रुपये द्या मी तुम्हाला ॲवॉर्ड मिळवून देतो” असे सांगितले. ऋषी कपूरचे वय त्यावेळी सारासार विचार करणारे नव्हतेच. त्याने त्याच्या पीए ला याबाबत विचारले त्याने देखील “पैसे द्या आणि अवार्ड घ्या” असा सल्ला दिला. ऋषी कपूर ने त्या व्यक्तीला तीस हजार रुपये दिले. आता त्या व्यक्तीने खरोखरच ते पैसे त्या संस्थेला देऊन अवार्ड विकत घेतले की पैसे स्वत:च्या खिशात घातले हे कुणालाच माहिती नाही. कदाचित ऋषी कपूरला हा पुरस्कार मिळणार हे त्या व्यक्तीला खात्रीने ठाऊक झाले असावे आणि यानिमित्ताने ऋषीकडून पैसे वसूल करता येतील असाही विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात आला असावा!

 Bollywood Gossip

खैर त्यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारासाठी जी नामांकन होती त्यामध्ये ‘यादोंकी बारात’ साठी धर्मेंद्र, ‘जंजीर’ करिता अमिताभ बच्चन, ‘कोशिश’ या चित्रपटा करीता संजीव कुमार आणि ‘दाग’ या चित्रपटासाठी राजेश खन्ना असे तगडे स्पर्धक ऋषी कपूर समोर होते. अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ करिता हा पुरस्कार मिळेल असे सर्व रसिकांना वाटत होते. पण या सर्वांवर मात करीत ऋषी कपूर यांना त्यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला!

=====

हे वाचलंत का: ऋषीकपूर – डिम्पल चा बॉबी ४७ वर्षाचा झाला.

=====

ऋषी कपूर यांना मात्र ही खंत कायम सलत होती आपण पैसे देऊन हा पुरस्कार विकत घेतला ही जाणीव त्यांना कायम टोचत होती. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या नात्यांमध्ये देखील काही काळ यामुळे दुरावा आला होता. या दोघांचा एकत्रित पहिला चित्रपट ‘कभी कभी’ हा १९७६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे परस्परांशी चकार शब्द बोलत नव्हते! पण नंतर काही वर्षांनी यांच्यातील दुरावा मिटला आणि पुढे ‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’ आणि ‘कुली’ या चित्रपटात या दोघांनी बहारदार अभिनयाची जुगलबंदी केली! अगदी अलीकडे ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटातदेखील या दोघांचा एकत्रित अभिनय पाहायला मिळाला. हे सर्व काही होत असताना कुठेतरी ऋषी कपूरला आपण आयुष्याच्या सुरुवातीला एक मोठी चूक केली आणि पैसे देऊन पुरस्कार विकत घेतला ही टोचणी मनाला खात होती.

Khullam Khulla by Rishi Kapoor
Khullam Khulla by Rishi Kapoor

२०१६ साली त्यांनी ‘खुल्लम खुल्ला’  या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्राचे लिखाण मीना अय्यर यांनी केले होते. या पुस्तकात त्यांनी आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुकीचा उल्लेख केला असून याची टोचणी आपल्याला कायम होत असते असे लिहिले आहे आणि या कृत्याचा मला आता पश्चाताप होतो असे देखील सांगितले आहे. अजाणतेपणे अविचाराने लहान वयात त्याच्याकडून ही चूक झाली. पण ऋषी कपूरचे मन मोठे म्हणायला पाहिजे  कारण त्यांनी शेवटी आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख करून आपल्याला पश्चाताप होतो आहे या भावना व्यक्त केल्या.

=====

हे नक्की वाचा: ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

=====

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Actor Bollywood Chitchat bollywood update Celebrity Talks Entertainment gossips
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.