‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऋषी कपूर होता ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरचा डाय हार्ड फॅन!
आपल्याकडे जसा रजत शर्मा यांचा ‘आप की अदालत’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे तसाच पाकिस्तानमध्ये ‘मेटा की अदालत’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची एक लिंक मध्यंतरी पाहायला मिळाली. त्यात ऋषी कपूर (Rishi Kapoor) एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा कसा फॅन होता याचा किस्सा सांगितला होता. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
१९७९ साली पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतामध्ये आली होती. हा दौरा तसा खूप ऐतिहासिक होता कारण तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताचा दौरा करत होती. दरम्यानच्या काळात दोन मोठी युद्ध या दोन देशांच्या दरम्यान झाली होती. या पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार आसिफ इक्बाल होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार त्यावेळी सुनील गावस्कर होता, या क्रिकेट टीम सोबत बीबीसी चे क्रीडा समालोचक वासिम कमर देखील आले होते. ते पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू होते. ‘मेटा की अदालत’ या कार्यक्रमात अलीकडेच वासिम कमर सहभागी झाले होते. त्यांनी या दौऱ्याच्या वेळेस चा एक रोचक किस्सा या कार्यक्रमात सांगितला होता.
एकदा वासिम कमर मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गेले असताना तिथे त्यांची भेट दिलीप कुमार यांच्या सोबत झाली. तिथे पाकिस्तानी अभिनेते मोहम्मद अली यांच्या सोबत आले होते. कमर यांना पाहिल्यानंतर लगेच त्यांना आपल्या सोबत ते रूमवर घेऊन गेले आणि म्हणाले,” चल आता आपल्याला राज कपूर यांच्याकडे जायचे आहे.” तेव्हा वासिम कमर म्हणाले “मी आत्ता धड कपडे देखील घातलेले नाहीयेत. जीन्स आणि टी-शर्ट आहे अशा अवस्थेत मी कसा काय तिकडे येऊ ?” त्यावर ते म्हणाले की,” काही होत नाही राज कपूरचे मुलं असेच कपडे घालतात. तू असाच चाल.” म्हणून बळेबळे त्यांनी राजकपूर यांच्याकडे पार्टीला घेऊन गेले.
तिथे गेल्यानंतर राज कपूर ने त्यांचे खूप जोरदार स्वागत केले. त्या पार्टीत ऋषी कपूर ला जेव्हा कळाले की पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि आताचे बीबीसी चे रिपोर्टर आलेले आहे तेंव्हा तो वासिम कमर यांना घेऊन आपल्या बेडरूम मध्ये तो गेला आणि म्हणाला,” वासिम भाई, माझे फार महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे. मी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा जबरदस्त फॅन आहे. मला त्यांच्याशी बोलायचे आहे.” त्यावर वासिम कमर यांनी विचारले ,” तू जहीर अब्बास चा फॅन आहेस?” ऋषी म्हणाला ,”नाही.” “तू इमरान खानचा फॅन आहेस का?” ऋषी म्हणाला ,”नाही.” अरे मित्रा, झहीर नाही इम्रान नाही मग तू कोणाचा फॅन आहेस?” त्यावर ऋषी कपूर म्हणाला ,” मी वासिम बारी या आपल्या विकेटकीपर चा फॅन आहे!” त्यावर तुम्हाला वासिम कमर म्हणाले ‘ओके” ऋषी म्हणाला ,” कृपया त्यांच्याशी मला बोलायचे आहे. तुम्ही प्लीज मला मदत करा.” योगायोगाने वासिम बारी तेव्हा मुंबईतच होते. त्यांना लगेच फोन लावण्यात आला, आणि ऋषी कपूरने त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या. ऋषी कपूर (Rishi Kapoor) बोलताना खूप उत्साहात झाला होता.
==========
हे देखील वाचा : एका कुलीने मारलेल्या हाकेमुळे मिथुनचा आत्मविश्वास वाढला
==========
बॉलिवूडचा तो खरं तर आघाडीचा अभिनेता होता पण आपल्या दैवता शी बोलताना तो खूपच आनंदी झाला होता. फोन ठेवल्यानंतर ऋषी म्हणाला,” तुम्ही माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचे काम करून दिले आहे. आता आणखी एक छोटीशी विनंती आहे. दोन आठवड्यानंतर माझे लग्न आहे. तुम्ही आणि वासिम बारी यांनी या लग्नाला यावे अशी माझी इच्छा आहे!” वासिम कमर यांनी तारीख विचारली. ऋषी ने सांगितले.”२२ जाने १९८०” त्यावेळेला नेमकी टेस्ट होती ते म्हणाले,” लग्नाला तर आम्ही येऊ शकत नाही कारण त्याच वेळेला कसोटी सामना आहे.” त्यावर ऋषी कपूर म्हणाला ,” ओके. मग आज रात्री माझ्या सोबत वासिम बारीला डिनर साठी तुम्ही ताजला घेऊन या प्लीज. “ पुन्हा एकदा वासिम बारी ला फोन लावण्यात आला आणि संध्याकाळी ऋषी कपूर वासिम बारी सोबत डिनरला गेला सोबत नीतू सिंग देखील होती. वासिम कमर भाई यांनी या कार्यक्रमात नंतर असे सांगितले की पुढची पंचवीस तीस वर्षे ऋषी कपूर (Rishi Kapoor) सोबत माझी भेट झाली नाही. परंतु अचानकपणे २०१२ साली ऋषी कपूर लंडनमध्ये आले होते आणि ते एका हॉटेल समोर उभे असताना मी त्यांना भेटलो. त्यांनी मला पहिल्यांदा ओळखलेच नाही. पण जेव्हा मी त्याला सांगितलं की ‘मी ती व्यक्ती आहे ज्याने वासिम बारी सोबत तुझी भेट घडवून आणली होती!” तेव्हा त्यांनी अतिशय हर्षोल्हासाने मला मिठी मारली आणि म्हणाला ,” कमर भाई आप कितने बदल गये?”