Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

रितेश देशमुख ठरला नॉन फिक्शनचा सम्राट; संपूर्ण महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’चीच धूम !
महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची धुरा लिलया पेलताना दिसत आहे. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’मुळे सध्या तुफान चर्चेत आहे. त्याचं लय भारी होस्टिंग, सदस्यांची शाळा घेण्याची विशेष शैली, कमाल पॉईंट्स आणि लयभारी अदांजाचं चाहत्यांसह ‘बिग बॉस’प्रेमींकडून प्रचंड कौतुक होत आहे. या सर्व गोष्टींमुळेच रितेश भाऊ छोट्या पडद्यावरील नॉन-फिक्शनचा राजा ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने रेकॉर्डब्रेक TVR मिळवत नवा विक्रम रचला आहे.(Ritesh Deshmukh Big Boss Marathi 5 )

मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने या आठवड्यात 4.3 TVR मिळवत सर्वच रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. वीकेंड स्पेशल भाऊच्या धक्क्याला शनिवारी 4.0 तर रविवारच्या भागाला 4.5 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’ची धूम असल्याचं चित्र स्पष्ट होतं. इतर वाहिन्यांवरील नॉन फिक्शन फिक्शन कार्यक्रमांना कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस मराठी’ने मागे टाकलं आहे.

‘बिग बॉस मराठी‘च्या नव्या पर्वातील घराने, घरातील सदस्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना चांगलीच अद्दल घडवत आहे. योग्य ती शिक्षा देत सदस्यांची दादागिरी बंद करत आहे. तिखट शब्दांत सदस्यांना सुनावत आहे. त्यामुळे ‘भाऊच्या धक्क्या’ची चांगलीच वाहवाह होत आहे. सोशल मीडिया असो वा गल्लीतील दहीहंडी सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’चा बोलबाला दिसून येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील सदस्यांचे डायलॉग, त्यावरील भन्नाट मीम्सचा सोशल मीडियावर वर्षाव होत आहे.(Ritesh Deshmukh Big Boss Marathi 5)
=============================
हे देखील वाचा: तेजस्विनी पंडितचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येक नंबर’च्या टिजर ने वाढवली उत्सुकता…
=============================
रितेश देशमुख ‘भाऊचा धक्का‘ गाजवत आहे. भाऊच्या धक्क्यावरील त्याची मांडणी, पॉईंट्स, एक्सप्लेनेशन, होस्टिंग या सर्वच गोष्टींचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. भाऊचे पॉईंट्स भारी, भाऊंचे एक्सप्लेनेशन भारी, भाऊंची होस्टिंग भारी, च्यामायला भाऊच एकदम लयभारी, अशा कमेंट्स चाहते करताना दिसून येत आहेत.