Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आता केवळ मराठीच नाही तर ५ अन्य भारतीय भाषांमध्ये दाखवला जाणार आहे. रितेश देशमुख याने ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार यात दिसणार असून त्यांच्यासोबत मराठीतील कलाकारही झळकणार आहेत. अशाच एका मराठमोळ्या कलाकाराची ‘राजा शिवाजी’ चित्रपटात वर्णी लागली असून त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Bollywood tadaka)

रितेश देशमुख (Ritesih Deshmukh) दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटात ज्या कलाकाराची निवड झाली आहे तो म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta ) या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव. सोशल मिडियावर त्याने एक पोस्ट टाकत लिहिलं आहे की, “‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला अभिमान आहे… ही संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे…”. दरम्यान, अजून कपिलसह इतर कलाकारही कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.(Entertainment news)

मोठ्या कॅनवासवर आपल्या शिवरायांचा इतिहास मांडण्याचं महत्वाचं पाऊल रितेश देशमुखने उचललं आहे. राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश स्वl: करणार असून यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील तोच साकारणार आहे. त्याच्यासोबत अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री, जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी असे अनेक मराठी आणि हिंदीतील दिग्गज कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. (Raja Shivaji movie cast)
================================
=================================
अभिमानाची बाब म्हणजे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम या सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात पाहता येणार आहे. (Raja Shivaji movie release date)