Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या सिनेमावेड्या माणसाने भारताला चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम दिलं. १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारताचा पहिला मूकपट प्रदर्शित झाला होता. तर हिंदी भाषेत १९३१ साली ‘आलम आरा’ (Alam Aara) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापासून हिंदी चित्रपटाचा पाया रोवला गेला. सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत तुटपुंज्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात होतं. कालांतराने तंत्रधानात आधुनिकता वाढली आणि Gfx, एडिटिंगच्या नव्या तऱ्हा वापरुन टॅक्नॉलॉजीपूर्ण चित्रपट येऊ लागले.पण तुम्हाला माहित आहे का ४३ वर्षांपूर्वी एक चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत आला होता ज्यात तब्बल ३ लाख लोकं शुटींगचा भाग होते. ग्रीन स्क्रिनचा वापर न करता इतका मोठा लोकांचा घोळका घेऊन शुट केला जाणारा ते चित्रपट कोणता होता आणि त्याचं मराठी कनेक्शन काय होतं जाणून घेऊयात…(Bollywood mvoies)

१९८२ साली Richard Attenborough दिग्दर्शित ‘गांधी’ (Gandhi) चित्रपट आला होता जो हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात महात्मा गांधी यांच्या अंतिम संस्काराचा एक सीन दाखवण्यात आला होता. जो शुट जरी करण्यात आला असला तरी आजही तितकाच खरा आणि भावनांनी पुरेपूर भरलेला आहे. तर, गांधीजींच्या अंत्य संस्काराचा हा सीन शूट करण्यासाठी जवळपास ३ लाखांच्या घरात लोकं सहभागी झाली होती. महत्वाचं म्हणजे खरा क्राऊड घेऊन त्यापूर्वी कुठल्याच चित्रपटाचा सीन शुट केला गेला नव्हता. (Gandhi Movie)

आत्याच्या २१ व्या शतकातले चित्रपट इतके अॅडव्हान्स आहेत की मुंबईत जरी शुटींग सुरु असेल तरी परदेशातील लोकेशनवर ते शुट सुरु आहे असं ग्रीन स्क्रिनच्या माध्यमातून भासवता येतं. किंवा १०० लोकांचा घोळका दाखवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरु शकतो इतकी आपली चित्रपटसृष्टी अपडेट झाली आहे. मात्र, चित्रपटांच्या जगात एक काळ असा होता जेव्हा आधुनिकता अस्तित्वातच नव्हती. चित्रपटांचं एडिटिंगही माणसचं करत होती. या काळातील एक चित्रपट म्हणजे ‘गांधी’ (Gandhi). ज्या चित्रपटात कुठेही ग्राफिक्स किंवा ग्रीन स्क्रिनचा वापर न करता खरी माणसं सहभागी झाली होती आणि गांधी चित्रपटाचा हा एक सीन शुट झाला होता. विशेष म्हणजे आत्तापर्यंत त्या सीनचा विक्रम कुठलाही चित्रपट मोडू शकला नाही आहे.(Bollywood tadaka)
================================
हे देखील वाचा: Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी मिळाली?
=================================
‘गांधी’ चित्रपटातीस हा सीन दिल्लीत शुट केला गेला होता. यासाठी ९४ हजारांपेक्षा जास्त पेड कलाकार आणि २ लाखांहून अधिक गांधीजींची अनुयायी सहभागी झाले होते. या सीनमध्ये कुठलेही स्पेशल इफेक्ट वापरले गेले नव्हते. ११ कॅमेरा युनिट्सने हा बावनिक क्षण टिपला होता. आणि लाखोंच्या गर्दीला भारतीय सैनिकांनी नियंत्रित करण्याचं काम केलं होतं. तसेच, या चित्रपटात कस्तुरबा गांधींची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारली होती. अभिमानाची बाब म्हणजे रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना गांधी चित्रपटासाठी BAFTA (British Academy of Film and Television Arts) पुरस्कार मिळाला होता. आणि आजवर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या आशियातील एकमेव अभिनेत्री आहेत. (Hollywood movies)

रसिका शिंदे-पॉल