
Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांचं निधन
हिंदीसह पंजाबी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांचं आज १५ जुलै २०२५ रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज यांनी १९६५ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

धीरज यांनी फिल्मफेअरने आयोजित केलेल्या एका टॅलेंट शोमध्ये सहभाग घेतला होता… या शोमध्ये त्यांच्यासोबत सुभाष घै आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) देखील होते.. या शो चे विजेते राजेश खन्ना झाले होते खरे मात्र यामुळे इंडस्ट्रीची दारं धीरज यांच्यासाठी उघडली आणि त्यांनी अभिनेता म्हणून आपला नवा प्रवास सुरु केला…
=================================
=================================
धीरज यांनी ७० ते ८०च्या दरम्यान २१ पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. या व्यतिरिक्त धीरज कुमार ‘हिरा पन्ना’, ‘रातों के राजा’, रोटी, कपडा और मकान’, ‘दीदार’, ‘बिजली’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या…
================================
=================================
अभिनयाचा प्रवास सुरु असताना धीरज यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ नावाने निर्मिती कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या बॅनरअंतर्गत ‘ओम नम: शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’ आणि ‘जप तप व्रत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती करण्यात आली. धीरज कुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी नक्कीच निर्माण झाली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi