Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली पुन्हा एकदा जादू दाखवणार
‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित भव्य बायोपिक पॅन इंडिया येणार असल्याची घोषणा एस.एस.राजामौली (SS Rajamaouli) यांनी २०२३ मध्ये केली होती. ज्या व्यक्तीने चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम लोकांना देऊ केले त्यांचं जीवन, त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर आला पाहिजे या भावनेने राजामौलींनी ‘मेड इन इंडिया’ची 9Made In India) घोषणा केली होती. आता या चित्रपटात दादासाहेब फाळकेंची भूमिका कोण करणार यावरुन पडदा बाजूला सारला असून साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर दादासाहेब फाळकेंची भूमिका ‘मेड इन इंडिया’ चित्रपटात साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Made in idnia biopic)

‘मेड इन इंडिया’ चित्रपटात भारतीय चित्रपटांचा सुरुवातीच्या काळात कसा विकास झाला, कोणत्या अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहुर्तमेढ रोवली याची खास गोष्ट ‘मेड इन इंडिया’ दिसणार आहे. आता लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. (Bollywood biopic)

वरुण गुप्ता (मॅक्स स्टूडियोज) आणि एस.एस.कार्तिकेय (शोइंग बिजनेस) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दरम्यान, राजामौली, कार्तिकेय आणि गुप्ता यांनी अनेक वर्ष चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम केले असून फायनल ड्राफ्ट अखेर लॉक करण्यात आला आहे. दादासाहबे फाळके यांच्याबद्दलचे काही युनिक किस्से या चित्रपटात पाहायला मिळणार असलं सांगण्यात येत आहे. तसेच, ज्यु. एन.टी.आर (Jr NTR) यांना दादासाहेबांच्या भूमिकेत पाहण्यासाठीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. (dadasaheb Phalke biopic)
================================
हे देखील वाचा: Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!
=================================
दरम्यान, एकीकडे राजामौली ‘मेड इन इंडिया’तून दादासाहेब फाळकेंचा इतिहास मांडणार असून दुसरीकडे आमिर खान आणि राजकूमार हिरानी यांनी देखील दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे. चित्रपटाची सुरुवात करणाऱ्या महान व्यक्तीवर चित्रपट करण्याचं पाऊल भारतीय चित्रपटसृष्टीतील ३ दिग्गजांनी उचललं असून या दोन्ही भव्य चित्रपटांची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. (Amir Khan and Rajkumar Hirani)