
अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटामुळे अक्षय खन्ना याची वट बॉलिवूडमध्ये वाढली आहे… २०२५ मध्येच लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात अक्षयने साकारलेली औरंगजेबाची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती… आणि त्याचपाठोपाठ या वर्षातील त्याच्या दुसऱ्या धुरंधर चित्रपटाने केलेली कमाल अनपेक्षितच आहे… अशातच काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा विजय साळगावकर आणि आयजी तरुण अहलावत समोरासमोर येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली… परंतु, सध्या अशी माहिती समोर येत आहे की अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’ मधून एक्झिट घेतली आहे… आता नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात…
खरं तर, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ चित्रपटांच्या यशानंतर अक्षय खन्नाची लोकप्रियता वाढली आहे.. अशातच ‘दृश्यम २’ (2022) मधील त्याच्या डॅशिंग अभिनयानंतर, ‘दृश्यम ३’ मध्ये त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. परंतु, निर्मात्यांशी अक्षयचं मानधनावरुन काहीतरी बिनसल्याचं वृत्त समोर येत आहे… अपेक्षित मानधन ‘दृश्यम ३’ साठी त्याला नाकारल्यामुळे त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे… (Akshaye Khanna)

काही माध्यमांच्या माहितीनुसार, आपली लोकप्रियता वाढल्यामुळे अक्षयने ‘दृश्यम ३’ च्या निर्मात्यांकडून २१ कोटी रुपये मानधन मागितलं. इतकी मोठी रक्कम त्याने मागितल्यामुळे निर्माते आश्चर्यचकित झाले. त्यांनी अक्षयला असं सांगितलं की एवढी मोठी रक्कम दिल्याने चित्रपटाचे बजेट वाढेल. पण अक्षय खन्नाला वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची ही मागणी योग्य वाटली. परंतु निर्मात्यांनी त्याची मागणी मान्य न केल्यामुळे तो चित्रपटाचा भाग नसल्याचं सांगितलं जात आहे.. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Drishyam : मोहनलालच्या ‘दृश्यम ३’ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?
================================
इतकंच नाही तर, अक्षय खन्ना आणि निर्मात्यांमध्ये इतर काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचंही समोर येत आहे.. त्यापैकी एक मुद्दा म्हणजे अक्षयने विग घालण्याचा सल्ला दिला होता. पण निर्मात्यांना ही कल्पना आवडली नाही, कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये तो विगशिवाय दिसणार होता. परंतु, मानधन आणि विग अशा कोणत्याच मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे कदाचित ‘दृश्यम ३’ मध्ये आता नवा आयजी दिसणार आहे.. अशातच सगळीकडे सध्या जयदीप अहलावतने (Jaideep Ahlawat) अक्षय खन्नाला ‘दृश्यम ३’ मध्ये रिल्पेस केल्याची चर्चा सुरु झाली आहे… याचं उत्तर प्रेक्षकांना २ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi