‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         मराठी मालिकाविश्वातल्या लोकप्रिय जोडप्याच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सध्या मराठी सिनेसृष्टीत एक महत्त्वाची जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवांच्या बातम्या जोर धरत आहेत. या चर्चांमागे एक मुख्य कारण म्हणजे योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सौरभसोबतचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी घडलंय का, असा सवाल उपस्थित होतोय.(Yogita Chavan and Saurabh chughole)

योगिता आणि सौरभ यांनी २०२१ मध्ये ‘जीव माझा गुंतला’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर एकमेकांसोबत प्रेमाची नवी गाठ बांधली होती. मालिकेत योगिता चव्हाणने ‘अंतरा’ तर सौरभ चौघुलेने ‘मल्हार’ या पात्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली आणि त्यानंतर एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

२ मार्च २०२४ रोजी त्यांनी लग्नाच्या फोटोशूटसह, ‘आयुष्यभराचा हमसफर’ अशी भावूक कॅप्शन दिली होती. त्यावेळी यांचं जोडपं कलाविश्वातील एक नवा आदर्श ठरला होता.सौरभ चौघुलेने धनत्रयोदशीच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याचं सजवलेलं घर दाखवण्यात आलं होतं, परंतु त्यात सौरभ एकटा होता आणि योगिता त्याच्या जवळ नव्हती. सोशल मीडियावर या फोटोच्या माध्यमातून चाहत्यांनी त्याला योगिता बाबत प्रश्न विचारले होते. मात्र, सौरभने या प्रश्नांचा खुलासा दिला नाही.(Yogita Chavan and Saurabh chughole)
=================================
==================================
योगिता आणि सौरभ यांच्या नात्यात खरंच काही समस्या आल्या आहेत का? किंवा  योगिता आपल्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो डिलिट करून काही वेगळा संदेश देऊ इच्छित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरीत आहेत. दोघांनाही या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही आहे.सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स हळूहळू आपल्या चिंता व्यक्त करत आहेत. काही फॅन्सना विश्वास आहे की हे केवळ अफवा आहेत, तर काहींना वाटतं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झाले आहे.
