Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

‘लपंडाव’ मालिकेतून Rupali Bhosale चा दमदार कमबॅक; साकरणार महत्वाचे पात्र !
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. थोड्या विश्रांतीनंतर रुपाली पुन्हा छोट्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली असून तिचा नवा प्रोजेक्ट आता चर्चेचा विषय ठरतो आहे.स्टार प्रवाहने अलीकडेच अनेक नव्या मालिका सादर केल्या आहेत. ‘हळद रुसली कुंकू हसलं’नंतर आता ‘लपंडाव’ या नव्या मालिकेची घोषणा झाली असून यामध्ये रुपाली भोसले प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.(Actress Rupali Bhosale Comeback)

या मालिकेत रुपाली तेजस्विनी कामत हे पात्र साकारणार असून तिच्या स्वभावात कमालीची सत्ता, पैसा आणि अधिकार यांचं आकर्षण दिसणार आहे. तेजस्विनीला सगळे ‘सरकार’ म्हणतात आणि घरात असो वा ऑफिसमध्ये, तिचंच वर्चस्व असतं. ही भूमिका रूपालीसाठी पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक ठरणार आहे.

या मालिकेबद्दल प्रतिक्रिया देताना रुपाली भोसले म्हणाली की, ‘आई कुठे काय करते’मध्ये संजनाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता ‘लपंडाव’मध्ये तेजस्विनी कामतच्या ग्लॅमरस आणि प्रभावी लूकसह मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हे पात्र साकारण्यासाठी संपूर्ण टीमनं माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे, आणि मलाही हे पात्र साकारणाची खूप उत्सुकता आहे,” असं रुपालीने सांगितलं.
================================
हे देखील वाचा: Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा !
=================================
या मालिकेत रूपाली सोबत कृतिका देव आणि चेतन वडनेरे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कृतिका बर्याच काळानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार असून चेतन ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर झळकणार आहे. ‘लपंडाव’ ही मालिका लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नातेसंबंध, सत्ता आणि व्यक्तिमत्त्व यांची गुंतागुंत दाखवणारी ही कथा प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.