‘आंदोलकांनी कार अडवली, घोषणा केल्या आणि…’अभिनेत्रीचा गाडी रोखून आंदोलनकर्त्यांची हुल्लडबाजी

Sabar Bonda : ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’ गाजवणारा पहिला मराठी चित्रपट लवकरच होणार रिलीज!
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा आहे… समाजात जे घडतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि चित्रपटातून काही बोल्ड विषय मास ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील चित्रपटांमार्फतच केलं जातं… आता मराठी किंवा प्रादेशिक भाषेतील चित्रपट म्हटलं की काही मर्यादा येतात… सेक्स रिलेटेड अति रक्तरंजितपणा असणारे, लैंगिकतेविषयी भाष्य करणारे विषय बऱ्यापैकी टाळले जातात… मात्र, आता तो टिपिकल विचारसरणीचा काळ लोटला असून मराठी मेकर्सने पुढे पाऊल टाकत बऱेच बोल्ड विषय चित्रपटातून मांडण्यास सुरुवात केली आहे… याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘साबर बोंडं’ (Sabar Bonda)… समलैंगिकता किंवा Gay या विषयावर चित्रपटाचं कथानक आधारित असून सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रिमियर होणारा हा पहिला भारतीय आणि पहिला मराठी चित्रपट ठरला आहे…विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशात साऊथ स्चार राणा दग्गुबती (Rana Daggubati) यांचंही मोठं योगदान आहे…

तर, ‘साबर बोंडं’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहन कनावडे (Rohan Parshuram Kanawade) यांनी केलं असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दोन पुरुषांच्या प्रेमाची कथा जी कधीच समाजमान्य होणार नाही यावर प्रकाशझोत टाकणारी आहे… मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी केली असून यात ‘साबर बोंडं’ या चित्रपटाला सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज – ड्रॅमॅटिक’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे… तसेच, हा चित्रपट राणा दग्गुबती यांच्या प्रॉडक्शन स्टुडिओ स्पिरिट मीडियाद्वारे भारतीय चित्रपटगृहांमध्ये सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच, नागराज मंजुळे, सई ताम्हणकर (Sai Tamhankar), निखिल अडवाणी, आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
आपला मुलगा किंवा आपल्या घरातील पुरुष हा Gay आहे हे मान्य करणं आजही २१व्या शतकात फार कठिण आहे… आणि त्यातच जर का ग्राणीण भागातील एखाद्या मुलाला किंवा पुरुषाला आपल्यातील शारिरिक बदल कुणाकडे व्यक्त करण म्हणजे घोर पाप आहे असं वाटतं… साबर बोंडं या चित्रपटातील दोन नायकांची व्यथा देखील अशीच आहे… चित्रपटाचा नायक (अभिनेता भूषण मनोज) आपल्या वडिलांचं निधन झाल्याचं कळताच शहरातून गावी येतो… हिंदु रिती-रिवाजाप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करुन झाल्यानंतर घरातील लोकं त्याच्या लग्नाबद्दल चर्चा करु लागतात… कारण, समाजात अशी मान्यता आहे की, वडिलांचं निधन झाल्यानंतर घरातील मुलाचं एका वर्षाच्या आत लग्न झालं पाहिजे… आणि त्यामुळेच आनंदच्या लग्नाची चर्चा सुर होते.. याचदरम्यान आनंद बाल्याला (अभिनेता सुरज सुमन) भेटतो आणि दोघांच्या वाढत्या जवळीकतेतून त्यांना आपली शारिरिक गरज वेगळी असल्याची जाणीव होते… आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे देखील त्यांना समजलं ; अर्थात समाजापासून लपवूनच… याशिवाय, घरातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर मुलावर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यातून सावरण्यासाठीची त्याची धडपड हा प्रवासही यातून दाखवण्यात आला आहे… तर, असा हा अतिशय संवेदनशील विषय साबर बोंडं या चित्रपटातून मांडण्यात आला आहे…

कौतुकाची बाब म्हणजे यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत समलैंगिकतेवर थेट भाष्य करणारे फारसे चित्रपट आले नाही आहेत… साधारण २०१७ मध्ये रवी जाधव (Ravi Jadhav)व दिग्दर्शित ‘मित्रा’ (Mitra Marathi movie) हा चित्रपट आला होता.. ज्याचं कथानक दोन महिलांच्या समलैंगिकतेवर आधारित होतं… या चित्रपटाची कथा विजय तेंडूलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’ आणि संदीप खरेंच्या ‘अताशा नकोसे वाटते मला हे’ या कवितेवर आधारित होतं… लेसबियन रिलेशनशिपवर भाष्य करणाऱ्या या मराठी चित्रपटात वीणा जामकर (Veena Jamkar) आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या… त्यामुळे इतर भाषिक चित्रपटांप्रमाणे मराठी मेकर्सही बोल्ड विषय ताकदीने चित्रपटांमधून मांडत असून त्याचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरांवरील फिल्म फेस्टिवल्समध्ये होत आहे हे गौरवास्पद आहे…
परंतु, सामाजिक, राजकीय, ग्रामीण भागातील कथा किंवा लैंगिकतेसंबंधातील विषय मांडणारे मराठी चित्रपट केवळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्सपुरतेच मर्यादित राहतात हि शोकांतिका आहे… परदेशात पुरस्कार मिळवून किंवा तेथील समीक्षक, प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच प्रेक्षक आणि थिएटर्स दुर्दैवाने मिळत नाहीत ही कटू सत्य परिस्थिती आहे… त्यामुळे येत्या काळात मराठी चित्रपटांचा कायापलट हा जितका दिग्दर्शक, कलाकार, निर्माते आणि मेकर्सच्या हातता आहे तितकाच तो प्रेक्षकांच्याही आहे…
============================
============================
‘सैराट’, ’कच्चा लिंबू’, ‘स्थळ’, ‘जोगवा’, ‘श्वास’, ‘द डिसायपल’ असे बरेच मराठी चित्रपट जे आपल्या मातीतील विषय चित्रपटांतून मांडत आहेतच; परंतु, त्याहीपलिकडे जात समाजातील काही महत्वाचे आणि न बोलले जाणारे विषयही हाताळत आहेत हे फार महत्वाचं आहे… त्यामुळे ‘साबर बोंडं’ या चित्रपटाला जसा परदेशात प्रतिसाद मिळाला आहे, तसाच किंबहूना त्याहून जास्त महाराष्ट्रात मिळावा हिच अपेक्षा आहे… हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार आहे…