Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’

Yere Yere Paisa 3 : “दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपटांचे प्रेक्षक येतात, पण…”; सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटांचे शो वाढवण्याचा प्रकार सुरु झालेला पाहायला मिळत आहे…. सध्या सैय्यारा चित्रपटाने थिएटर्समधील शो हाऊसफुल्ल केले असून परिणामी येरे येरे पैसा ३ या मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने शो उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येताना दिसत असून दुसरीकडे महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. (Marathi entertainment news)

सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “एक हिंदी सिनेमा जोरात चालला आहे म्हणून मराठी सिनेमा ला दुसरा आठवड्याची संधी मिळत नाही हे दुर्दैवी आहे. मराठी सिनेमाला अनेकदा दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक यायला लागतो.त्यावेळी मराठी सिनेमाची थिएटर्स हिंदी सिनेमाच्या दबावात कमी होतात आणि त्याची व्यवसाय करण्याची क्षमता संपते हे सतत होतय. यावर ठोस उपाय झाला पाहिजे..किमान दोन आठवडे शोज मिळाले पाहिजे.” (Bollywood news)

दरम्यान, सैय्यारा चित्रपटामुळे केवळ मराठी चित्रपटांवरच नाही तर हिंदी चित्रपटांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे… या चित्रपटामुळे सोनाक्षी सिन्हा हिच्या निकिता रॉय आणि अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर फार वाईट परिणाम झाला आहे… तसेच, अजय देवगण याच्या ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) चित्रपटाची रिलीज डेट २५ जुलै ऐवजी आता १ ऑगस्ट करण्यात आली आहे…. त्यामुळे आता येत्या काळात मराठी चित्रपटांच्या शो साठी काय ठोस पावले उचलली जातात याकजे सगळ्यांचं लक्ष आहे…(Bollywood movies)
================================
हे देखील वाचा: Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’?,
=================================
दरम्यान, संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाची चर्चा आहे. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार अशी हटके स्टारकास्ट या चित्रपटात आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi