Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“जगासाठी ते ‘अमित’जी असतील पण माझ्यासाठी ते…” काय म्हणाले Sachin Pilgoankar?

 “जगासाठी ते ‘अमित’जी असतील पण माझ्यासाठी ते…” काय म्हणाले Sachin Pilgoankar?
मिक्स मसाला

“जगासाठी ते ‘अमित’जी असतील पण माझ्यासाठी ते…” काय म्हणाले Sachin Pilgoankar?

by रसिका शिंदे-पॉल 10/06/2025

मराठीसह बॉलिवूडही गाजवणारे अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून केलेली चित्रपटातील सुरुवात आज ५५ वर्ष उलटून गेली तरी अजून सुरुच आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे सचिन पिळगांवकर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या अगदी घरातील सदस्यच आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी अमिताभ बच्चन यांना ते कोणत्या नावाने हाक मारतात याचा खुलासा केला आहे. जाणून घेऊयात..(Bollywood News)

सचिन पिळगांवकर यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सत्ते पे सत्ता’, ‘बालिका वधू’, ‘त्रिशुल’, ‘शोले’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र कामं केली पण ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटापासून दोघांची गट्टी जास्त जमली. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबतच्या नातेसंबंधांबद्दल लोकमत फिल्मीशी बोलताना सचिन म्हणाले की,”आमचं नातं खूप चांगलं आहे. लोकं त्यांना ‘अमितजी’ किंवा ‘बच्चन साहेब’ म्हणतात. पण मी त्यांना ‘भाई’ म्हणतो.” (Sachin Pilgoankar and Amitabh Bachchan Movies)

यानंतर सचिन यांनी जया बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या अनोख्या बॉंन्डचा खुलासा केला. ते म्हणाले की, “मी जयाजींच्या जास्त जवळ आहे. गंमत म्हणजे, मी जयाजींसोबत एकाही चित्रपटात काम केलं नाही. तरीही त्या माझ्याशी खूपच गोड बोलतात, माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्या माझे खूप लाड करतात.आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही!” असं हसत म्हणत असताना पिळगांवकर म्हणाले, “कधीकधी ते म्हणतात, ‘ये जया के दहेज में आया है…’ त्यांना कदाचित असं वाटत असेल की, ‘हा जास्त हिच्या जवळ का? माझ्या का नाही?” सचिन पिळगांवकर यांच्या बोलण्यातून त्यांचं बच्चन कुटुंबाशी फार घनिष्ट नातं आहे हे दिसून येतं. (Jaya Bachchan News)

================================

हे देखील वाचा: Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापटावर आधारित चित्रपट इतिहास रचणार?

=================================

दरम्यान, सचिन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजवर त्यांनी ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आम्ही सातपुते’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘एकूलती एक’, ‘भूताचा भाऊ’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित करुन त्यात अभिनयही केला आहे. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीला विनोदी चित्रपटांचा अमुल्य काळ देणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf), महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि सचिन पिळगांवकर यांनी एकत्र येऊन आणखी एक चित्रपट करावा अशी नक्कीच प्रत्येक रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. (Sachin Pilgoankar Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bacchan ashok saraf bollywood movies Entertainment industry jaya bachchan Laxmikant Berde Mahesh Kothare marathi movies sachin pilgoankar sholay movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.