
“आताचा काळ लहानांकडून शिकण्याचा”; Sachin Pilgoankar यांनी GenZ बद्दल मांडलं मत
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करत आज ५० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत व्यतीत करणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतातच… खरं तर इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव असल्यामुळे पिळगांवकरांकडे किस्से असणारच आणि त्यांच्या याच अनुभवांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो… आता नुकत्याच एका कार्यक्रमात सचिन यांनी नव्या पिढीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे…
पुणे लिट फेस्टमध्ये ‘टू जर्नीज टू लीगसीज – स्टोरीज ॲक्रॉस जनरेशन्स’ या विषयावरील सत्रात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांनी सहभाग घेतला होता… यावळी बोलताना सचिन म्हणाले की, “माझ्या आजवरच्या प्रवासाचे श्रेय माझे दिग्दर्शक, सहकलाकारांना आहे. किती वर्षांची कारकीर्द केली, यापेक्षा काय काम केले हे महत्त्वाचे आहे. आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा आहे. बदल स्वीकारत पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या कलाकृतींतून लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करीत आलो”… (Marathi Movies)

दरम्यान, या आधी सचिन यांना ट्रोल करणाऱ्या लोकांवर निशाणा साधत श्रिया पिळगांवकर हिने तिचं मत मांडलं होतं… “ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे”. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : ….म्हणून Laxmikant Berde यांनी पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ रिजेक्ट केला!
================================
दरम्यान, श्रिया पिळगांवकरच्य़ा आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती सैफ अली खान सोबत ‘हैवान’ (Haiwaan) चित्रपटात दिसणार आहे… या व्यतिरिक्त ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ चित्रपटातही झळकणार आहे… तसेच, या वर्षात बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये की विविधांगी भूमिकेत दिसली होती. परंतु, ‘मंडाला मर्डर्स’मधील (Mandaala Murders) तिची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली… (Shriya Pilgoankar)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi