Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Sagar Karande : आता कधीच स्वारगेटे बाई ऑन स्क्रिन दिसणार नाही!
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमाने १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सुत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) ते प्रत्येक कलाकार यांनी आपल्या अभिनय आणि सादरीकरणातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विविध विषयांवर सादर होणारी विनोदी प्रहसन जितकी गाजली;तितक्याच गाजल्या कार्यक्रमात पुरुषांनी साकारलेल्या स्त्रियांच्या भूमिका. भारत गणेशपुरे, भाऊ कदम (Bhau Kadam) आणि सागर कारंडेने उत्तम स्त्री भूमिका निर्माण केल्या. पण आता उत्कृष्ट स्त्री पात्र साकारणाऱ्या सागर कारंडेने एक महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची घोषणा सोशल मिडीयावर केली आहे. (Sagar Karande)
विनोदी मालिका, चित्रपटविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे सागर कारंडे. विनोदाची उत्तम जाण असलेला सागर कारंडे यापूढे कधीच स्त्री पात्र साकारणार नाहीये. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सागरने साकारलेल्या स्त्री पात्रांना लोकप्रियता मिळाली. यातील स्वारगेटे बाई हे पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं होतं. पण आता सागरने पोस्ट करत लिहिलं आहे की, “यापुढे स्त्री पात्र करणार नाही”. त्याच्या या निर्णयामुळे सागरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असून त्याने असा निर्णय का घेतला याबद्दल नेटकरी त्याला प्रश्न विचारत आहेत. (Marathi trending news)

नेटकऱ्यांनी सागरच्या (Sagar Karande) या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे, “स्वारगेटे बाई तुम्ही सगळं बंद करा, पण हे नका बंद करू we miss you”, “कोणतंही पात्र करा, भारीच असतं”, “पण का? तुम्ही स्त्री पात्रात छान दिसता”, “काय विनोद करता राव…तुमचे कित्येक स्त्रीपात्रांनी आम्हाला हसवलंय…”, “मग शो पाहण्यात मजा नाही”. सागरने तब्येतीच्या कारणामुळे चला हवा येऊ द्या मालिकेला राम राम केला होता. त्यानंतर तो सध्या मालिका, चित्रपट किंवा अन्य कार्यक्रमांपासूनही लांब आहे. अशातच आता स्त्री पात्र कधीच साकारणार नाही असंही त्याने स्पष्ट केल्यामुळे सागरने कारणही सांगावं अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून केली जात आहे. (Social media trend)
==========
हे देखील वाचा : Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
==========
…स्त्री पात्र साकारल्यानंतर माझ्यात माणूस म्हणून
दरम्यान, सागरने (Sagar Karande) एका मुलाखतीत साडी नेसून स्त्री भूमिका साकारतानाचा अनुभव व्यक्त करत म्हटलं होतं की, “स्त्री पात्र साकारताना आधी त्रास व्हायचा. कारण, साडी नेसणं, पदर सांभाळणं हे सगळं कठिण आहे. पण काही काळाने मला सवय झाली. विशेष म्हणजे स्त्री भूमिका साकारल्यानंतर माझ्यात खुप बदल झाला. पुर्वी मी बायकोला तयार होण्यासाठी वेळ लागतो म्हणून कटकट करायचो. आता मात्र मी काहीच बोलत नाही कारण मी स्वत: त्या भूमिकेसाठी तयार व्हायला वेळ लावतो”. (Entertainment Masala)