
Ramayan : साई पल्लवीचे सीता मातेच्या गेटअपमधील फोटो आले समोर!
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपट कधी येणार याची वाट सगळेच पाहात आहेत…नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत…काही महिन्यांपूर्वी ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो लीक झाले होते.. सध्या ‘रामायण’ चित्रपटाचं मुंबईत शुट सुरु असून साई पल्लवीचे केशरी रंगाच्या साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत. (Ramayan Movie)

साई पल्लवी ‘रामायण’ मध्ये सीता मातेची भूमिका साकारणार असून या फोटोंमध्ये तिने केसांचा छान अंबाडा बांधला आहे आणि मोजकेच साधे दागिने घातले आहेत. साई पल्लवीला या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Bollywood upcoming movie)

दरम्यान, ‘रामायण़’ (Ramayan) चित्रपटात यश (Yash) रावणाच्या भूमिकेत, सनी देओल (Sunny Deol) हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे.. याशिवाय अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) देखील या चित्रपटात कैकेयीची भूमिका साकारताना दिसणार आहे… नितेश तिवारी Ramayan भव्य चित्रपट दोन भागांमध्ये तयार करणार असून पहिला भाग २०२६ साली रिलीज होणार आहे तर दुसरा भाग २०२७ मध्ये येणार आहे.