Sai Paranjpye : यांना ‘चष्मे बद्दूर’ हे टायटल कसे मिळाले?
सिनेमाचे टायटल वर सिनेमाचे यश अवलंबून असते असं एकेकाळी म्हटलं जायचं. त्यामुळे सिनेमाच्या शीर्षकाला फार महत्व असायचे. निर्माता दिग्दर्शक बऱ्याचदा कन्फ्युज असतात चित्रपटाचा शीर्षक काय असावं? कारण सिनेमात शीर्षक जर कॅची असेल तर चित्रपटाकडे प्रेक्षक वर्ग आपोआप ओढला जातो. दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) यांच्या ऐंशीच्या दशकात आलेल्या एका चित्रपटाच्या बाबत नेमका असंच झालं होतं. अनपेक्षितपणे त्यांना या सिनेमाचे टायटल मिळालं आणि हे टायटल सिनेमाला चपखल बसलं. सिनेमा सुपर डुपर हिट झाला. नेमका काय झाला होता या टायटलचा किस्सा?
झालं असं होतं Sai Paranjpye आपल्या ‘स्पर्श’ (१९८०) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी ताश्कंद येथे फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या. तिथे त्यांची भेट निर्माता गुल आनंद यांच्याशी झाली. त्या भेटीतच सई परांजपे (Sai Paranjpye) यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे कथानक त्यांना ऐकवले आणि हा चित्रपट तुम्ही प्रोड्युस करावा असे विनंती केली. गुल आनंद यांना ते कथानक खूप आवडले होते त्यांनी लगेच स्वीकारले.
मुंबईत आल्यानंतर सई परांजपेने (Sai Paranjpye) चित्रपटावर काम सुरू केले. चित्रपटाची स्टार कास्ट ठरली. दीप्ती नवल आणि फारुख शेख प्रमुख भूमिका होते. Saeed Jaffrey हे खरंतर इंग्लंडमधील नाट्य कलावंत पण ते देखील या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. रवी वासवानी, राकेश बेदी आणि इतर कलावंत चित्रपटात फिट बसले होते. चित्रपटाची गाणी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजच्या हिंदी विभागाच्या प्रमुख हिंदू जैन यांनी लिहिले होते. तर चित्रपटाला संगीत Raj Kamal यांची होते. चित्रपटातील गाणी खूपच छान बनली होती. सिनेमाचे छायाचित्रण वीरेंद्र सैनी यांनी केले होते.
चित्रपटाला एक छान सई टच होता. हलकीफुलकी कथा, फ्रेश चेहरे, हलकेफुलके त्यातील ट्विस्ट अँड टर्नस आणि प्रेक्षकांना कथेच्या फ्लोमध्ये गुंतवून ठेवण्याची क्षमता सई परांजपे (Sai Paranjpye) यांच्यामध्ये होती. सिनेमाचे बव्हंशी शूट दिल्लीत झाले होते. चित्रपट पूर्ण होत आला पण चित्रपटाचं टायटल काय असावं यावर मात्र अजून पर्यंत एकमत होत नव्हतं.
Gul Anand यांना सई परांजपे (Sai Paranjpye) म्हणाल्या, ”मी याच कथानकावर दूरदर्शनसाठी एक शॉर्ट फिल्म बनवली होती तिचे नाव होते ‘धुवां धुवां’. मला वाटतं हेच नाव योग्य आहे!” त्यावर निर्माते गुल आनंद म्हणाले, ”मॅडम तुम्ही आपल्या डिस्ट्रीब्युटर्सच्या जमातीला ओळखत नाही. ते खूप सुपरस्टिशियस असतात. त्यांना अजिबात वेगळे काही खपत नाही टायटल बाबत तिथे खूपच आग्रही असतात. ते म्हणतील तुम्ही आमचा पैसा ‘धुवां धुवां’ करून उडवून टाकला. त्यामुळे हे टायटल नकोच.” काय करायचे? सई परांजपे आणि गुल आनंद रोज खूप चर्चा करत होते. इतरांना भेटत होते पण साजेसे टायटल काही मिळत नव्हतं.
पण एक दिवस अचानकपणे त्यांना टायटल मिळाले. कसे? हे दोघे मुंबईला एका ऑफिसमध्ये गेले होते. तिथे लिफ्टची वाट पाहत दोघे खाली थांबले होते. तितक्यात एक छोटी चुणचुणीत मुलगी आली. तिने मस्त फ्रॉक आणि केसांचा बो बांधला होता. त्या छोट्या मुलीला पाहून लिफ्टसाठी वेटिंग करणारा एक माणूस म्हणाला, वाहवा क्या खूबसूरत हो तुम बेटा. तुम्ही किसी की नजर ना लगे. चष्मेबद्दूर!” झालं हा शब्द दोघांना क्लिक झाला. या चष्मेबद्दूर फारसी शब्दाचा अर्थ होता की ‘कुणाची नजर न लागो’ दोघांनाही तो शब्द खूप आवडला आणि तिथल्या तिथे त्यांनी तो शब्द फायनल केला आणि चित्रपटाचे नाव ठरलं ‘चष्मे बद्दूर’.
============
हे देखील वाचा : Omkarnath Thakur: ‘या’ हुकुमशहाच्या निद्रानाशाचा विकार बरा केला संगीतकाराने !
============
जाता जाता थोडंस या Chashme Buddoor सिनेमाबाबत. सई परांजपे (Sai Paranjpye) यांच्या दिग्दर्शन शैलीने त्या काळातील मारधाड सिनेमाच्या भाऊ गर्दीत हा सिनेमा चालून गेला. दीप्ती नवल हिचा फ्रेश लूक या सिनेमाचा प्लस पॉईंट होता. दीप्ती त्या काळात नॅशनल क्रश बनली होती. ८ मे १९८१ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील कहां से आयी बदरा, काली घोडी द्वार खडी, प्यार लगावत प्रणय मुहोब्बत, इस नदी को मेरा.. ही गाणी अप्रतिम बनली होती!