Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Sai Tamhankar : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना धुळ चारत सईने केला नवा रेकॉर्ड
मराठी अभिनेत्री केवळ नऊवारी साडी, नाकात नथ, केसांचा आंबोडा याच लूकमध्ये कायम दिसेल हा विचार मोडून काढत मराठी चित्रपटसृष्टीत बिकिनी घालून मॉर्डन ट्रेण्ड आणणारी पहिली अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिची गाडी सध्या सुसाट सुटलीये. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटात पहिल्यांदा सई ताम्हणकरने बिकिनी घालत केवळ हिंदी अभिनेत्रीच बॉल्ड लूक करु शकतात या विचाराला तिने मागे टाकलं. आता पुन्हा एकदा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकत सई ताम्हणकरने एक नवा विक्रम केला आहे. (Bollywood update)
सई ताम्हणकर नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘डब्बा कार्टेल’ (Dabba Cartel) या वेब सीरीजमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसली. तिच्या अभिनयाने तिने लोकांची मनं जिंकली आहेतच; शिवाय IMDB च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तिने (Sai Tamhankar) स्थान पटकावले आहे. ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरीजमुळे तिला अमिताभ बच्चन, दीपिका पाडूकोण, शाहरुख खान, Aishwarya rai यांच्यासोबत IMDBच्या यादीत आपलं स्थान निर्माण करता आलं आहे. ७ मार्च २०२५ पर्यंतच्या IMDBची माहिती समोर आली असून त्यात सई ताम्हणकरने ही अचिव्हमेंट केली आहे. (IMDB 2025 list)

IMDB च्या मार्च २०२५ च्या यादीत Sai Tamhankar चा दोनदा समावेश झाला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना सई म्हणाली, “मला महिन्यातून दोनदा आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत येण्याचा आनंद आहे. आयएमडीबी ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी सतत स्वतः उल्लेख करते आणि हीच गोष्ट केकवरील आयसिंग आहे. प्रेक्षकांच्या प्रेमातून हेच उत्पन्न होते हे समजून घेणे हे खूपच खास आहे.” (Entertainment masala)

दरम्यान, ‘डब्बा कार्टेल’ पूर्वी नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘भक्षक’ या चित्रपटात Bhoomi Pednekar सोबत सईने स्क्रिन शेअर केली होती त्यातही ती पोलिसच होती. जिओस्टारवरील ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’ (The secret of shiledar) या वेब सीरीजमध्येही सईने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
===============================
हे देखील वाचा : Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
===============================
‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटापासून सुरु झालेला Sai Tamhankar चा अभिनयाचा प्रवास आज तिच्या करिअरला नवी भरारी देत आहे. बॉलिवूडमध्ये तिने स्वत:च स्थान निर्माण करत आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी चित्रपटसृष्टीचं नाव मोठं केलं आहे. लवकरच सचिन कुंडलकर लिखित आणि दिग्दर्शित Mysuru Premkatha या भारतीय इंग्रजी फिचर चित्रपटात सई आणि ललित प्रभाकर दिसणार आहेत. (Entertainment news)