Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

‘त्याने मागून माझ्या कमरेला हात लावला अन्…’ Sai Tamhankar ने सांगितला धडकी भरवणारा अनुभव …
Sai Tamhankar मराठी सिनेसृष्टीतील एक प्रामाणिक, ठाम आणि निडर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयातील ताकद जितकी प्रभावी आहे, तितकाच तिचा आवाजही स्पष्ट, निर्भीड आणि प्रेरणादायी आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला, जो केवळ तिचा वैयक्तिक अनुभव नसून, अनेक महिलांच्या मनात दडलेल्या आठवणींना स्पर्श करणारा आहे.(Actress Sai Tamhankar)

या मुलाखतीत सई प्रसंग सांगताना म्हणाली की , ‘मी बसने यायचे. एकदम सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी काम सुरू केलेलं. तेव्हा सांगलीवरून मी बसने प्रवास करायचे. रात्री बसमध्ये बसायचे जी मला सकाळी मुंबईला सोडायची. एकदा मी बसली होती बसमध्ये आणि मागे एक मुलगा बसलेला. मागच्या सीटवरून हात आला माझ्या कमरेजवळ. त्या मुलाने मागून माझ्या कमरेला हात लावला. मी घाबरले, म्हटलं कोणाचा हात आहे हा? मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि त्याला मुरगळला. मी त्याला म्हटलं, परत हा हात आला तर तुला हात वेगळा मिळेल. मला नाही भीती वाटत कोणाची. तो जोरात ओरडला, इतक्या जोरात मी त्याचा हात मुरगळला.’

या अनुभवाविषयी ती ‘हॉटरफ्लाय‘ या डिजिटल मुलाखतीदरम्यान बोलत होती. तिच्या डोळ्यांत त्या प्रसंगाची आठवण होती, पण त्यात भीती नव्हती होती फक्त तीव्रता, आत्मविश्वास आणि एक संदेश. “माझ्या शरीरावर कुणाचा हक्क नाही. आणि जेव्हा कुणी माझ्या परवानगीशिवाय स्पर्श करतो, तेव्हा मी शांत बसणार नाही,” हे तिने केवळ त्या मुलाला नव्हे, तर सगळ्या समाजालाच ठामपणे सांगितलं.(Actress Sai Tamhankar)
=============================
=============================
सईचा हा अनुभव तिच्या जिद्दीचा, स्वाभिमानाचा आणि प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातल्या निडर आवाजाच एक प्रतीक आहे. तिचा प्रवास सांगलीहून मुंबईपर्यंतचा असो, किंवा संघर्षातून यशापर्यंतचा प्रत्येक टप्प्यावर ती खंबीर राहिली आहे. आज ती फक्त एक अभिनेत्री नाही, तर अनेकांसाठी आवाज बनली आहे. या अनुभवातून एक गोष्ट शिकता येते – प्रसंग कोणताही असो, जागा कुठलीही असो, आपण आवाज उठवला पाहिजे. अन्यायासमोर उभं राहणं म्हणजे आपलं अस्तित्व सिद्ध करणं. सईने ते केलं… आणि तेच तिला खऱ्या अर्थाने मोठं करतं.