Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Genelia Deshmukh : ‘वेड २’ चित्रपटाबद्दल जिनिलिया वहिनींनी दिली अपडेट!

Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”

‘या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर Mohammad Rafi मन्ना डे यांच्या गळ्यात पडून

Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची

Subodh Bhave : “महाराष्ट्रात हिंदी बोला मराठी कळत नाही हे

R Madhvan : “मी तामिळ असूनही मला मराठी…”; मराठी-हिंदी भाषा

Do Bigha Zamin निमित्त व्हेनिस चित्रपट महोत्सवात

Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!

Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सैगल सोबत नूरजहां : एक हुकलेला योग…!

 सैगल सोबत नूरजहां : एक हुकलेला योग…!
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

सैगल सोबत नूरजहां : एक हुकलेला योग…!

by धनंजय कुलकर्णी 17/01/2021

हिंदी सिनेमा बोलायला लागला १९३१ सालच्या “आलमआरा” (Alam Ara) पासून. १९३५ च्या “धूप छांव” पासून पार्श्वगायनाचे तंत्र विकसित झाले असले तरी कुंदन लाल सैगल ( K. L. Saigal) आणि नूरजहां (Nur Jahan) यांनी पडद्यावर फक्त स्वत:साठीच गायन केले. चाळीसच्या दशकाच्या पूर्वार्धातील संपूर्ण कालखंड या दोन स्वरांनी व्यापून गेला होता. सैगल कलकत्त्याच्या न्यू थिएटरच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर आला.

अवघं ४२ वर्षांचं आयुर्मान लाभलेल्या सैगलची रूपेरी कारकिर्द उणीपुरी पंधरा वर्षांची. शरतचंद्र यांच्या देवदासचा (बालम आओ बसो मेरे मन मे) तो नायक बनला १९३५ साली. पुढे कलकत्त्यात राहून त्याने प्रेसीडेंट (इक बंगला बनेन्यारा), स्ट्रीट सींगर (बाबुल मोरा नैहर छोटो भे जाये), दुष्मन (करू क्या आंस निरास भई), धरती माता (दुनिया रंगरंगीली बाबा), जिंदगी (सो जा राजकुमारी सो जा) हे चित्रपट केले. अभिनयापेक्षा त्याचा गाण्यावर अधिक जीव होता. प्रेक्षक सुध्दा त्याच्या गाण्याचे दिवाने होते. एव्हाना त्याच्या स्वराची डंका मुंबईत देखील वाजू लागली होती.

१९४१ साली सैगल मुंबईत आला व रणजित स्टुडिओच्या “भक्त सूरदास” (निस दिन बरसत नैन हमारे)चा नायक बनला. मुंबईत आल्यावर माय सिस्टर (दो नैना मतवारे हन्म पर जुलुम करे), तानसेन (बाग लगा दूं सजनी), शहाजहान (गम दिये मुश्तकील कितना नाजूक है दिल) या सिनेमांनी मोठी लोकप्रियता मिळविली. याच कालखंडाला समांतर अशी मलिका – ए-तरन्नूम नूरजहांची कारकिर्द होती.

हे हि वाचा : …आणि ओपींच्या संगीताने सगळ्यांचे आयुष्य घडले

१९४२ साली ती प्राण सोबत “खानदान” (तू कौनसी बदली में मेरे चांद है आजा) पासून पडद्यावर नायिकेच्या रूपात आली. दोस्त (बदनाम मुहोब्बत कौन करे), जीनत (नाचो सितारो नाचो), गांव की गोरी (बैठी हूं तेरी याद का लेकर के सहारा), बडी मां (आ इंतजार है तेरा), जुगनू (हमे तो शाम ए गम मे काटनी हैं जिंदगी अपनी), अनमोल घडी (जवां है मुहोब्बत हंसी है जमाना). १९४५ साली सैगल आणि नूरजहां यांची रूपेरी कारकिर्द अगदी शिखरावर होती. मग विचार येतो या दोघांनी एकत्र एकही गाणं कां म्हटल नसेल???

या दोन सुपरस्टार्सला घेवून सिनेमा बनवावा असं कुणालाच कसे वाटले नसेल??? या दोघांना एकत्र येण्याचा योग जुळून येणार होता. तशी तयारी पण सुरू झाली होती. नूरजहांचे पती निर्माते दिग्दर्शक शौकत हुसैन रिझवी यांच्या डोक्यात एक कथानक होते व त्या कथेवर ते या दोघांना घेवून एक सिनेमा बनविणार होते. मुस्लीम सोशल सिनेमाचे कथानक असलेली ही कहाणी लखनौ या नवाबी शहरात घडणार असते. सारी तयारी झाली होती पण सैगलची तब्येत आता त्याला साथ देत नव्हती. देशातील राजकीय वातावरण देखील तापले होते.

 १८ जानेवारी १९४७ ला सैगलचे निधन झाले व या सिनेमाच्या निर्मितीवर कायमचा पडदा पडला. दोन समकालीन ग्रेट कलावंत कधीच एकत्र नाही येवू शकले. पुढे फाळणीनंतर नूरजहां तिच्या पती सोबत पाकला निघून गेली. पुढे तब्बल १४ वर्षांनी गुरूदत्तने याच कथेवर एक सिनेमा बनविला जो सुपर हीट ठरला. सिनेमा होता “चौदहवी का चांद”. जर सिनेमा पूर्वीच आला असता नूरजहां “चौदहवी का चांद” मधील नायिकेच्या रूपात दिसली असती…! पण हा योग नव्हता. आज १८ जानेवारी ! कुंदनलाल सैगल यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांचे स्मरण.

(सैगल ची अविस्मरणीय गाणी) (सौजन्य यु ट्यूब)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.