Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’?,
राज्यात एकीकडे मराठी-हिंदी भाषावाद सुरु असून दुसरीकडे मराठी चित्रपट पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामुळे अडकला आहे… सध्या बॉक्स ऑफिसवर सैय्यारा चित्रपट धुमाकूळ घालत असून या चित्रपटामुळे १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या येरे येरे पैसा ३ चित्रपटाच्या शोवर परिणाम झाला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यारा (Saiyara) चित्रपटामुळे थेअटरमालकांनी मराठी चित्रपटाच्या स्क्रीन कमी केल्यामुळे आता मनसे (MNS) आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये सामना होणार असल्याचं दिसून येत आहे. (Marathi Movies)

दरम्यान, संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांमी केली आहे… आणि आता या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाच्या आड येत आहे… प्रेक्षक सैय्यारा चित्रपटाला अधिक प्रतिसाद देत असल्यामुळे स्क्रिन कमी केल्या आहेत असं एकीकडे सांगितलं जात असताना दुसरीकडे मात्र, मराठी चित्रपटाच्या स्क्रीन कमी करण्यामागे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे पक्षातर्फे सिनेमा थिएटर मालकांना इशारा देण्यात आला असून मराठी चित्रपटांना स्क्रीन द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने ताळ्यावर आणू, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
================================
हे देखील वाचा : अभिनेता Shubhankar Tawde ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला ‘टीव्ही ऐवजी मी….’ !
=================================
दरम्यान, येत्या काळात बरेच मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत.. त्यामुळे जर का थिएटर्सकडून असेच मराठी चित्रपटांचे शो किंवा स्क्रिन्स कमी केल्या गेल्या तर मराठी चित्रपटांचं भविष्य धोक्यात आहे… तसेच, येरे येरे पैसा ३ चित्रपटाच्या स्क्रिन्स कमी केल्या आहेत त्यावर आता थिएटर्सकडून काय पावलं उचलली जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi