‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा
सध्या सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) चित्रपटाची… अनपेक्षितपणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसांत १०० कोटींचा पल्ला पार केला असून सलमान, शाहरुखच्या चित्रपटांनाही टक्कर दिली आहे… यंगस्टर्स तर सैयारा पाहून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत.. जाणून घेऊयात मोहित सुरी (Mohit Suri) याच्या सैयाराने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे… (Bollywood News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५ कोटी, सहाव्या दिवशी आत्तापर्यंत २.३२ कोटी कमवत एकूण १३४.५७ कोटींची कमाई केली आहे. (Saiyaara movie box office collection)
================================
=================================
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,’सैयारा’ चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनला देखील मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर, स्टुडंट ऑफ द इयर (७० कोटी) आणि जान्हवी कपूरचा धडक (७३ कोटी) यां चित्रपटांनाही कमी दिवसांत कमाई करण्याच्या शर्यतीत ही मागे टाकलं आहे. ‘सैयारा’ चित्रपटात अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहानसोबत चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डाने प्रमुख भूमिका साकारली आहे. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi