Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Gen Z जनरेशनच्या डोळ्यात पाणी आणणारा Saiyaara ओटीटीवर कधी येणार?
सगळीकडे सध्या अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या सैय्यारा (Saiyaara Movie) चित्रपटाची क्रेझ सुरु आहे… बड्या-बड्या कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकत सैय्याराने अवघ्या ११ दिवसांत २५० कोटींचा टप्पा पार केला आहे…. आजच्या यंगस्टर्सच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या ‘सैय्यारा’ चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमध्ये काही जणं रडताना तर काही जणं बेशुद्ध पडत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते…. आता थिएटर गाजवल्यानंतर मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार जाणून घेऊयात त्याबद्दल…(Bollywood News)

दरम्यान, १८ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेला ‘सैय्यारा’ चित्रपट प्रेक्षकांना लवकरच नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे… मात्र, अद्याप रिलीज डेट जाहिर झाली नसली तरी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते. नियमांनुसार, कोणताही चित्रपट थिएटरनंतर आठ ते दहा आठवड्यांनी ओटीटीवर येतो. त्यामुळे अंदाजे दिवाळीत ‘सैय्यारा’ ओटीटीवर येण्याचा अंदाज आहे. (Entertainment News)
आता जरा वळूयात चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे… तर, ‘सैय्यारा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५ कोटी, सहाव्या दिवशी २१.५ कोटी, सातव्या दिवशी १९ कोटी, आठव्या दिवशी १८ कोटी, नवव्या दिवशी २६.५ कोटी, दहाव्या दिवशी ३० कोटी, अकराव्या दिवशी २.५७ कमवत आत्तापर्यंत २४९.८२ कोटींची कमाई केली आहे… (Saiyaara Box office collection)
================================
=================================
अनन्या पांडे हिचा भाऊ असणाऱ्या अहान पांडे याने पहिल्याच पदार्पणात हा सुपरहिट चित्रपट दिला आहे…तर, अभिनेत्री अनित हिनं याआधी ‘सलाम वेंकी’ चित्रपटामध्ये आणि ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ या वेब सिरीजमध्येही ती झळकली होती. आता लवकरच हा चित्रपट ५०० कोटी क्लबमध्ये सहभाग होणार अशी चिन्हं तरी दिसत आहेत… शिवाय, सैय्यारा चित्रपटाच्या हाऊसफुल्ल गर्दीमुळे अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांचा ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे आणि येरे येरे पैसा ३ चित्रपटाच्या शो वरही परिणाम झाले आहेत…(Entertainment News Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi