Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Taath Kana Movie Trailer:  जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Suraj Chavan चं केळवण! बायकोेसाठी घेतला भारी उखाणा एकदा ऐकाचं…

Last Stop Khanda Movie Trailer: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा हलकाफुलका, भावनिक

Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल

चक्क Salman Khan याला ऑफर केली होती ऐश्वर्या रायच्या भावाची

Anwar: हमसे क्या भूल हुयी जो ये सजा हमको मिली…

Gondhal Movie : इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’!

थिएटर गाजवल्यानंतर Dahshavatar आता ओटीटीवर कल्ला करायला सज्ज!

‘देसी गर्ल’ Priyanka Chopra बॉलिवूड नाही तर साऊथमधून करणार कमबॅक!

रेकॉर्डिंगच्या वेळी झालेली चूक Kishore Kumar यांनी शूटिंगच्या वेळी कशी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Saleel Kulkarni : “‘तिचं’ कणखर रूप….” सलील कुलकर्णींची महिलादिनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

 Saleel Kulkarni : “‘तिचं’ कणखर रूप….” सलील कुलकर्णींची महिलादिनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल
मिक्स मसाला

Saleel Kulkarni : “‘तिचं’ कणखर रूप….” सलील कुलकर्णींची महिलादिनी केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

by Jyotsna Kulkarni 08/03/2025

जिच्याशिवाय या संपूर्ण जगाचा कारभारच चालू शकत नाही असा महत्वाचा घटक म्हजे ‘स्त्री’. आपण कितीही ‘पुरुषप्रधान संस्कृतीचा’ आव आणला तरी देखील स्त्रीशिवाय काहीच शक्य नाही. तुमच्या दृष्टीने जे जे उत्तम गुण व्यक्तीत असायला पाहिजे ते सर्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गुणांनी स्त्री परिपूर्ण असते. सुरुवातीला चूल आणि मुलं सांभाळणारी स्त्री हट्टाने आणि लढून उंबरठा ओलांडून बाहेर पडली आणि इथेही तिने यशच मिळवले.(Saleel Kulkarni)

आज आधुनिक जगात देखील स्त्री तिची ओळख तयार करताना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात देखील महिला स्वतःला सिद्ध करताना दिसत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आला आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी देखील विविध पोस्ट शेअर करत आपल्या जीवनातील आणि सर्वच महिलांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय संगीतकार आणि गायक असलेल्या सलील कुलकर्णी यांनी देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे.(Saleel Kulkarni Post)

========

हे देखील वाचा : Hemant Dhome:“सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला ”,फडणवीसांकडे मागणी

========

“‘ती’ एका बाजूला .. ‘तिचं’ कणखर रूप खूप लहानपणापासून पाहिलंय…आईबरोबर आमचा बाबा होऊन जेव्हा तिने एकटीच्या बळावर पेललं आभाळ. आणि पिल्लांना कसलीही झळ लागू दिली नाही. सायीसारखी मऊ आजी झालीये आता, पण अजूनही आयुष्याच्या डोळ्याला डोळा देऊन ती घराला जपते आहे आणि एका बाजूला “बाबा ..मी सगळं नीट करते, तू काळजी करू नकोस,” असं म्हणणारी बाबाची मुलगी होऊन सुद्धा बाबाला सांभाळणाऱ्या ‘तिला’ पाहतोय.(International Women’s Day)

अनेकांच्या चष्म्यावर वर्षानुवर्षे साचलेली धूळ साफ करावीशी वाटलीच…तर साफ करा आणि पाहा ती .. चांद्रयानापासून क्रिकेटपर्यंत आणि वैद्यकीय क्षेत्रापासून पोलिस दलापर्यंत… ‘ती’ आपलं घर, समाज , देश सगळं सांभाळू शकते…फक्त तिला आनंदाने जगू द्या… ‘तू छान दिसतेस’च्या पुढे जाऊन ‘तुझं काम उत्तम आहे’ असं म्हणूया? (Entertainment Mix Masala)

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

गायिकेला गाण्यासाठी आणि कवयित्रीला कवितेसाठी दाद देऊया… फक्त तिच्या फोटोला ‘गॉर्जस’ म्हणण्यापेक्षा…घरात, समाजात आणि सोशल मीडियावर सुद्धा…ती मोकळेपणाने तिचं मत व्यक्त करू शकेल, असं वातावरण ठेवूया? तिला एखाद्याला ‘लग्नापासून’ ते फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्टपर्यंत ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार आहे याचा आदर करूया? तिला एक दिवस डोक्यावर घेण्यापेक्षा, कायम आपल्याबरोबर उभं करूया? … मनांत आणि जगात सुद्धा ..(Marathi Top News)

आपल्या आसपासच्या स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाला फुलू द्यायला मदत नाही करता आली तर किमान अडवणूक तरी नको करायला…त्यांच्या स्वप्नांना पंख वगैरे द्यायला जमत नसतील तर किमान त्या वर उडत असताना खालून दगड मारला नाही तर बरंय..’तिला’ सुरक्षित वाटतं नाही हा समाजातल्या पुरुषांचा पराभव आहे…आपण आपल्या मुलांवर संस्कार करायला हवेत…जेणेकरून मुलींच्या आईबाबांना शांत वाटेल, सुरक्षित वाटेल…महिला दिनाच्या शुभेच्छा.(Top Stories)

=========

हे देखील वाचा : Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!

=========

माझा प्रिय मित्र स्वानंद किरकिरेने लिहिलेलं आणि राम संपतने संगीतबद्धल केलेलं हे माझं आवडतं गाणं आहे. जेव्हा शुभंकर हे गाणं गातो तेव्हा मला खूप आवडतं.”

दरम्यान सलील कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या मुलाचा शुभंकर हा गाणे गात असल्याचा व्हिडिओ, देखील पोस्ट केला आहे. सध्या सलील याच्या या पोस्टचे आणि शुभंकरच्या गाण्याचे देखील भरभरून कौतुक होताना दिसत आहे. सलील यांनी संगीतकार आणि गायक म्हणून नावलौकिक तर कमावलाच आहे, सोबतच यशस्वी दिग्दर्शक म्हणून देखील ते आता ओळखले जातात.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Celebrity Celebrity News director salil kulkarni Entertainment Featured international womens day marathi Saleel Kulkarni salil kulkarni shubhankar kulkarni singer salil kulkarni Video womens day मराठी महिला दिन शुभंकर कुलकर्णी व्हिडिओ सलील कुलकर्णी सलील कुलकर्णी पोस्ट सलील कुलकर्णी व्हिडिओ
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.