
Sikandar : “आप हमको बाहर ढूंढ रहें…”, सलमानच्या’सिकंदर’चा ट्रेलर रिलीज
हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान अर्थात सगळ्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी नवा कोरा चित्रपट घेऊन आला आहे. बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज झाला असून प्रेक्षकांचा ट्रेलरलाच कमाल प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सलमान खानची स्क्रिनवरील केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. दरवर्षीप्रमाणे यंदा सलमान संजय राजकोट ही नवी भूमिका साकारणार असून वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी तो लढताना दिसणार आहे. (Bollywood news)

सलमान खानच्या’सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच “आप हमको बाहर ढूंढ रहे हो और हम आपला घर में इंतजार कर रहे है” या धमाकेदार डायलॉगने सुरुवात होते आणि मग सुरु होता खरा खेळ. चित्रपटात सलमान खानला राजकोटचा राजा मानलं जातं. यात जरी लोकं त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखताना दाखवली असली तरी लोकांच्या मदतीला धावून येणाऱ्या सिकंदरची एक अनोखी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शिवाय, सलमान खानच्या बायकोची भूमिका निभावणाऱ्या रश्मिका मंदाना हिने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केले आहे. सोशल मिडीयावर सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलरने तुफान प्रतिसाद मिळवला असून या पॉवर पॅक ट्रेलरनंतर चित्रपटाची आथुरतेने सलमान खानचे फॅन्स वाट पाहात आहेत. (Sikandar movie trailer)
===========
हे देखील वाचा : Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
===========
‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना सोबत काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर असे मातब्बर कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे सिकंदरमध्ये ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपट फेम कटप्पा (Kattappa) म्हणजेच अभिनेते सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीला २८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता; पण सलमान खाननं रिस्क घेत यंदा शुक्रवार किंवा नेमक्या ईदच्या दिवशी नव्हे तर रविवारी ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रविवारी प्रेक्षक नेमका सिकंदरला प्रतिसाद कसा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Bollywood Dhamaka)