Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Salman Khan:‘प्रत्येक हाड २-३ वेळा मोडलं’, सलमान सांगितला अनुभव
अभिनेता सलमान खान (Salman Khan) ईदच्या निमित्ताने यावर्षीही आपल्या चाहत्यांसाठी अॅक्शन आणि मनोरंजनाने भरपूर भरलेला नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहे. ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटातून तो आपल्या भेटीला येणार असून त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. रविवार ३० मार्च २०२५ रोजी ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ प्रदर्शित होणार असून चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. विकी कौशलच्या ‘छावा’’ (Chhaava) चित्रपटानंतर सिकंदर चित्रपट यावर्षातील बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणारा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, नुकतंच सलमानने त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि अॅक्शन चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. (Bollywood masala)

३५ वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सलमान खान (Salman Khan) प्रेमपटांसोबत अॅक्शनपटांसाठीही ओळखला जातो. दबंग, एक था टायगर आणि आता सिकंदर. या चित्रपटातही तो जोरदार अॅक्शन करताना दिसणार असून शुटींगचे काही किस्से इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सलमानने सांगितले आहेत. तो म्हणाला की,’माझ्या शरीरातील प्रत्येक हाड दोन-तीनवेळा मोडलं आहे. प्रत्येक लिगामेंट २-३ वेळा फाटले आहेत. असं असूनही आत्ताच्या काळात अभिनेत्यांचा या धाटणीच्या चित्रपटांकडेअधिक कल पाहायला मिळातो. यावर त्याने असं म्हटलं की,, भावनांशिवाय अॅक्शन निरर्थक आहे. (Entertainment news)
==================================
==================================
काही दिवसांपूर्वी ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सलमानची (Salman Khan) ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले असून आता छावा नंतर रश्मिकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमान खानसह प्रतीक स्मिता पाटील, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, सत्यराज, नवाब शाह हे कलाकारही दिसणार आहेत. (Bollywood upcoming movies)