
Salman Khan : “मेरी पिक्चर बुरी हो या..”, १०० कोटी कमाईवर सलमानचं वक्तव्य
सलमान खान आणि ईद हे समीकरण घट्ट जुळलं आहे. इतकंच नाही तर ईदच्या दिवशी चाहत्यांना खात्री असते की सलमान धमाकेदार चित्रपट घेऊन येणारच. आणि ठरल्याप्रमाणे यंदाही सिकंदर हा चित्रपट सलमान खान (Salman khan) घेऊन येत असून रश्मिकासोबत ऑन स्क्रिन एक नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान खानचा चित्रपट म्हटलं की तो हमखास १०० कोटी पार करणार हे नक्कीच. आणि आत्ता स्वत:च सलमानने त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर भाष्य केले आहे. “१०० कोटीच काय २०० कोटी चित्रपट आरामात कमवत आहेत”. (Sikandar movie)
सलमान खान (Salman khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सिकंदर चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आता चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला सलमानने बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलताना म्हटले की, “ईद, दिवाळी, न्यू ईयर किंवा कोणताही सण असो. चित्रपट चांगला असो किंवा वाईट प्रेक्षक भरभरुन माझ्या चित्रपटांना प्रेम देतातच आणि चित्रपट १०० कोटी पार करतात”. पण आपली चुक पुन्हा सुधारत सलमान म्हणाला की, “१०० कोटी फार आधीचा बाब आहे आता २०० कोटी पार करतातच”.(Bollywood update)

सलमान खान आणि त्याच्या १०० कोटी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर यात, ‘टायगर ३’ (Tiger 3) (२८४ कोटी), ‘किसी का भाई किसी की जान’’ (१०२ कोटी), ‘भारत’ (२०१ कोटी), ‘दबंग ३’ (१३८ कोटी), ‘टायगर जिंदा है’ (३३६ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे. तर, ‘मैने प्यार किया’, ‘’हम आपके है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘नो एन्ट्री’, ‘रेडी’ हे सलमानचे ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. सातत्याने एकाहून एक दर्जेदार चित्रपट देत राहणं आणि प्रेक्षकांमध्ये आपली लोकप्रियता टिकवून ठेवणं हे सोप्प काम नाही. पण ३७ वर्ष बॉलिवूडमध्ये आपला स्टारडम टिकवून ठेवण्यास इंडस्ट्रीतील तीनही खान यशस्वी झाले आहेत यात शंका नाही.(Entertainment news)
कारण, आजही सलमान, शाहरुख (Shahrukh Khan) किंवा आमिरच्या (Amir Khan) चित्रपट रिलीज होणार असेल तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतेच. लवकरच, सलमानचा ‘सिकंदर’ (Sikandar), शाहरुखचा ’किंग’ (King) आणि आमिरचा ‘सितारे जमिन पर’ (Sitare Jameen Par) आणि ‘लाहौर १९४७’ (Lahore 1947) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Bollywood upcoming movies)
===========
हे देखील वाचा :Sonali Kulkarni : “मी सतत त्यांच्याकडे पैसे…”, सोनालीच्या बालपणीचा संघर्ष
===========
सलमान खान-रश्मिका यांचा ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी रिलीज होणार आहे. या निमित्ताने १०० कोटी बॉक्स ऑफसेट कलेक्शनबद्दल काय म्हणाला सलमान?