‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पडद्यावर दिसणार सलमान-दिशाची केमिस्ट्री… राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई!
राधे… (Radhe) भारताबरोबर ४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपाठोपाठ सलमान आणि दिशा पाटनी यांचे सिटी मार हे गाणंही सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं आहे. काही क्षणातच या गाण्याला लाखो लाईक मिळाले. पण याबरोबरच सलमान ट्रोलही झाला आहे. कारण राधेच्या घोषणेआधी सलमान कोरोनावॉरीअर्सची मदत करतांना दिसला. हाच नेमका मुहूर्त साधून राधेची घोषणा केली. त्यामुळे सलमानची मदत म्हणजे पब्लिसिटी स्टंट म्हणून त्याच्यावर टिका झाली. त्याचबरोबर सिटी मार गाण्यात त्यानं साऊथ स्टार अल्लू अर्जून याची कॉपी केली आहे. सलमानच्या चाहत्यांना त्याचा लूक आवडला तरी अल्लू अर्जूनच्या चाहत्यांनी मात्र सलमानला अल्लू अर्जूनची कॉपी काही जमली नसल्याच्या पोस्ट या गाण्यावर केल्या आहेत.
कोरोनामुळे वर्षभर रखडलेला सलमान खानचा (Salman Khan) राधे आता काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे राधेचे… शुटींग थांबवण्यात आले. लॉकडाऊन उठल्यावर सलमान आणि त्याच्या टीमनं शुटींग कसेबसे पूर्ण केले. पण हा बीगबजेट चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यावर सलमान ठाम होता. कोरोनामुळे पुन्हा राधेला फटका बसला, चित्रपटाचे प्रदर्शन रखडले. यावर उपाय म्हणून राधे… १३ मे रोजी मोठ्या पडद्याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. झी प्लेक्स आणि झी 5 वर राधे बघता येणार आहे. याशिवाय भारतातील काही चित्रपटगृहांबरोबर मिडल ईस्ट, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलैंड, सिंगापूर, यूरोप मिळून चाळीस चित्रपट गृहांमध्ये राधे प्रदर्शित होईल.
राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलं आहे. सलमानबरोबर हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे. 2008 मध्ये आलेल्या वॉन्टेड या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच राधे असल्याचं बोललं जातंय. यात सलमान ड्रग्ज विक्रेत्यांच्या विरोधात उभा राहिलेल्या पोलीस अधिका-याच्या भूमिकेत आहे. रणदीप हुडा हा ड्रग्ज व्यापा-याच्या भुमिकेत आहे. याशिवाय जॅकी श्रॉफही पोलीस अधिका-याच्या भूमिकेत असणार आहे.
राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अपेक्षेप्रमाणे त्याला सलमानच्या लाखो चाहत्यांनी लाईक केले आहे. दिशा पाटनी (Disha Patani) यात सलमानची अभिनेत्री असून सलमान आणि दिशाचा ऑनस्क्रीन किसिंग सीन सर्वाधिक चर्चेचा ठरलाय. कारण जवळपास तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सलमानचा हा ऑनस्क्रीन पहिलाच किसींग सीन असल्यानं त्याचीच चर्चा जास्त होत आहे. याबरोबरच त्याचं सिटीमार गाणंही चर्चेत आलं आहे. सलमानचे हे गाणे कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. दाक्षिणात्य रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद म्हणजेच डीएसपी यांनी सीटीमार हे गाणं कंपोज केलं आहे. डीएसपी यांनीच सलमानचं ढिंक चिंका हे गाणं कंपोज केलं होतं. हे गाणंही लोकप्रिय झालं होतं. सिटी मारची कोरिओग्राफी जानी मास्टर आणि प्रभूदेवा यांनी केली आहे.
राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई, हा सलमान साठीही महत्त्वाचा चित्रपट आहे. कारण त्याच्या वयाचे अभिनेते आता हिरो म्हणून बाद होऊ लागले असतांना सलमान मात्र हिरो म्हणून वावरतोय.
55 वर्षाचा सलमान आणि 28 वर्षाची दिशा पाटनी ही जोडी राधे..मध्ये आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे राधे…ही दे मार पट आहे. त्यामुळे त्यात दिशाला किती संधी असेल हे लवकरच समजेल. पण तरीही त्या दोघांमधील वयाचा फरक सिटीमार गाण्यात दिसून आलाय. आता चित्रपटात ही जोडी कशी दिसेल हे लवकरच समजणार आहे.
=====
हे देखील वाचा: सिंगल स्क्रीन वा मल्टीप्लेक्स, लोकांना थेटर्सकडे खेचून आणणारा बॉक्स ऑफिस किंग – सलमान खान!
=====