Manoj Kumar : पंतप्रधान इंदिरा गांधींशी थेट भिडलेले ‘भारत कुमार’!

Salman Khan : “मलाही सपोर्टची गरज आहे पण इंडस्ट्रीतील लोकं…”
दरवर्षीप्रमाणे यंदाही ईदच्या निमित्ताने सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट प्रदर्शित झाला… ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटाची गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अधिक होत आहे.. पण चांगल्या नाही तर वाईट कारणामुळे… चित्रपटाची कथा, सलमानचा अभिनय न आवडल्यामुळे सिकंदरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे… मुंबईत बऱ्यापैकी चित्रपटाला प्रतिसाद मिळत असला तरी देशभरात बऱ्याच थिएटर्समध्ये चक्क ‘सिकंदर’चे शो काढून स्थानिक चित्रपट लावण्यात आले आहेत.. अशात आता सलमान खानंच त्याच्या चित्रपटाबद्दलचं एक विधान सध्या तुफान व्हायरल झालं आहे.. काय आहे ते वाचा..(Bollywood news)
सलमान खान (Salman khan) गेले अनेक वर्ष ईदच्या दिवशी चाहत्यांना नवा चित्रपट आणून भेट देतोय.. पण सध्या त्याच्या चित्रपटांना फारसं यश मिळत नाही आहे.. आणि यामुळेच सिकंदरच्या निमित्ताने झालेल्या काही मुलाखतींमध्ये सलमानने मलाही सपोर्टची गरज आहे असं म्हटलं आहे… बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सलमाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या..’हिंदी इंडस्ट्रीतील मित्र माझ्या चित्रपटाचं कौतुक इतकं करत नाहीत’, अशी खंतही सलमानने व्यक्त केली. सलमान प्रत्येक वेळी त्याचे मित्र आणि इतर कलाकारांच्या चित्रपटांना सपोर्ट करतो. परंतु मला आणि माझ्या चित्रपटांनाही सपोर्टची गरज आहे, असं त्याने मान्य केलं. “अनेकांना वाटतं मी आत्मनिर्भर आहे. मला इतरांच्या सपोर्टची गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण असं काही नाहीये. मलाही इतरांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे”. (Entertainment trending news)
===========================
हे देखील वाचा: Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ला प्रेक्षकच मिळेना!;थिएटर मालकांनी घेतला निर्णय
===========================
सलमान खान (Salman Khan) याने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले पण कदाचित त्याच्या चाहत्यांचा तो प्रेम म्हणून जास्त आवडला.. कौटुंबिक चित्रपटांमधील त्याचा अभिनय अॅक्शन चित्रपटांपेक्षा अधिक प्रेक्षकांना भावला.. याची सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे ‘हम आपके है कौन?’ (Hum Aapke hain kaun?)आणि ‘हम साथ साथ है’. (Hum Sath Sath Hai)…त्यामुळे Family Oriented चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याचा मानस सध्या सलमानचा असून पुन्हा एकदा दिग्दर्शित सूरज बडजात्या यांच्यासोबत तो नव्या चित्रपटात दिसणारं असं सांगितलं जात आहे…(Salman khan movies)

दरम्यान, सलमानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी, दुसऱ्या दिवशी २९ कोटी, तिसऱ्या दिवशी १९.५ कोटी, चौथ्या दिवशी ९.७५ कोटी कमवत आत्तापर्यंत केवळ ८४.२५ कोटींची कमाई केली आहे… या चित्रपटात ५०० कोटींचे चित्रपट बॅक टू बॅक नावावर असलेली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) असूनही चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक असल्यामुळे आता चर्चा चांगलीच रंगली आहे…(Sikandar box office collection)