Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

जीवा महाला-सलमान खान, अफझल खान-संजय दत्त; Riteish Deshmukhचा ‘राजा शिवाजी’ चालणार का?
‘वेड’ (Ved Movie) चित्रपटानंतर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे… विशेष म्हणजे मराठीतील हा पहिला वहिला बिग बजेट चित्रपट असून हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नडा आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे… काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील स्टारकास्ट अनाऊन्स केली होती आणि आता यात बॉलिवूडच्या आणखी दोन सुपरस्टार्सची भर पडली आहे… सलमान खान आणि संजय दत्त… आता ते कोणत्या भूमिकेत राजा शिवाजी चित्रपटात दिसणार आहेत ते जाणून घेऊयात…. (Marathi Movie)

जर का तुम्हाला असं विचारलं की, जीवा महाला यांच्या भूमिकेत अभिनेता सलमान खानला (Salman Khan) बघायला आवडेल का? आवडो न आवडो… पण आता हे फिक्सच झालं आहे की, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात जीवा महाला यांची भूमिका सलमान खानच साकारणार आहे. नुकतंच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्टेटमेंट दिलं होतं की, मराठीसाठी १० कोटी म्हणजेच बिग बजेट असतं. पण रितेशचा आगामी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बिग बजेट Expectations च्याही पुढे असणार आहे. ते सोडा आताच त्याला ‘Magnum Opus’ म्हटलं जात आहे… त्यामुळे हा चित्रपट राडा घालणार हे तर फिक्सच आहे. पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार ,‘राजा शिवाजी’ या चित्रपटात अफझल खानाच्या भूमिकेत संजय दत्त (Sanjay Dutt) आणि जीवा महाला यांच्या कॅमीओ रोलसाठी सलमान खानचं नाव समोर आलं आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महागाथेवर आधारित आतापर्यंतचा सर्वात जास्त बजेट असणारा मराठी चित्रपट आहे. सुरुवातीला रितेशने दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्यासोबत या महागाथेच्या तीन पार्ट्सची Announcement केली होती. पण त्यांच्यात काही कारणांमुळे ताटातूट झाली आणि आता लिखाणासोबत दिग्दर्शनाची धुरासुद्धा रितेश देशमुखच सांभाळत आहे. दिग्दर्शक म्हणून हा रितेशचा दुसराच चित्रपट… त्यातच शिवराय, मराठा इतिहास असा संवेदनशील विषय… नुकतंच रितेशने या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा Launch केलं होतं…

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे… याशिवाय संजय दत्त अफझल खानाच्या भूमिकेत दिसणार आहे. भाग्यश्री पटवर्धन ही मांसाहेब जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख, अमोल गुप्ते असे तगडे अभिनेतेही यात दिसणार आहेत. हा चित्रपट अफझल खान वधापर्यंत दाखवणार असल्याचीही चर्चा आहे. म्हणजे यामध्ये शिवजन्मापासून ते १६५९ सालापर्यंतचा इतिहास आपल्याला पाहायला मिळू शकतो. बरं आपला मुद्दा होता सलमान खान… तर सलमान खान हा शिवरायांचे विश्वासू सरदार जीवा महाला यांची भूमिका साकारणार आहे… (Raja Shivaji Movie Cast)

सलमान खानने याआधीही रितेशच्या दोन चित्रपटांमध्ये Cameo रोल केला आहे. ते म्हणजे ‘लई भारी’ आणि ‘वेड’… आता पुन्हा एकदा रितेशचा हा खास मित्र मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. पण सलमान खानची जीवा महाला यांच्या पात्रासाठी Announcement झाल्यानंतर काही प्रेक्षक नाराज झाले आहेत आणि तर काही प्रेक्षक खुश आहेत… नाराज प्रेक्षक तर इतकं सुद्धा म्हणत आहेत की, आम्ही चित्रपट आता पाहणारच नाही.. सलमान किती जाडजूड वाटेल वगैरे… पण काही लोकं त्याचं स्वागतही करत आहेत… विशेष म्हणजे ३६ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सलमान एखादं ऐतिहासिक पात्र साकारत आहे आणि तेसुद्धा मराठी चित्रपटात !

शिवाय, या चित्रपटाला अजय -अतुल (Ajay Atul Music) यांचं संगीत असणार म्हणजे धिंगाणा होणारच… ‘छावा’चित्रपटाचं संगीत ऐकल्यानंतर ए आर रेहमान यांच्या ऐवजी अजय-अतुलचं संगीत असायला हवं होतं अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती… मात्र, राजा शिवाजी या भव्य ऐतिहासकपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा अजय-अतुलचं रांगड संगीत ऐकायला मिळणार आहे… यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा सर्वात बेस्ट सिनेमेटोग्राफर संतोष सिवान हे ‘राजा शिवाजी’ची सिनेमेटोग्राफी करणार आहेत. त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांना आपल्या केवळ सिनेमेटोग्राफीने हिट केलं आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांमधले दिग्गज रितेश देशमुखच्या या magnum opus साठी एकत्र येणार आहेत.
================================
================================
चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, राजा शिवाजी चित्रपटाचं बजेट ५० कोटींपेक्षा जास्त असणार असं सांगितलं जात असून… सहा प्रादेशिच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच निश्चितच १०० कोटी कमावण्याची धमक तर चित्रपटात आहेच, शिवाय, बॉक्स ऑफिसवर पहिला २०० कोटी कमावणारा मराठी चित्रपटसुद्धा ‘राजा शिवाजी’ ठरू शकतो. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची रांगच लागली आहे. अगदीच ‘कांतारा’ (Kantara Movie) फेम रिषभ शेट्टीसुद्धा (Rishabh Shetty) आपल्या आगामी चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. पण त्याच्या आधीच रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ मधून काय जादू करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे. (Historical Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi