‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Salman Khan’s House: घरावर झालेल्या गोळीबारावर सलीम खान यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, संपूर्ण कुटुंब दुसरीकडे शिफ्ट होणार?
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि क्षणाक्षणाला अहवाल घेत आहेत. दुसरीकडे, लॉरेन्स बिश्नोई टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र त्याचे वडील आणि अभिनेते-लेखक सलीम खान यांनी या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान यांनी ‘काळजी करण्याची गरज नाही’ असे सर्वांना आवाहन केले.(Salman Khan’s House)
14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने 4 राउंड फायर केले होते. गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि घबराट पसरली. गोळ्या झाडल्या तेव्हा सलमान खान घरी उपस्थित होता. गुन्हे शाखेने सीसीटीव्हीमधून सापडलेल्या हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, सलमान खानचे चाहतेही अभिनेत्याला पाठिंबा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. सलीम खान यांनी सीएनएन न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, ”सध्या काही सांगण्यासारखे नाही. त्यांना (हल्लेखोरांना) फक्त प्रसिद्धी हवी आहे, काळजी करण्याची गरज नाही.”
गोळीबाराच्या घटनेनंतर सलीम खान आपले वांद्रे येथील घर सोडण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. तथापि, सूत्रांनुसार अशी कोणतीही योजना नाही किंवा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहणार आहे. गोळीबाराच्या घटनेने खान कुटुंब चिंतेत आहे. मात्र, पोलिसांनी त्यांची भेट घेऊन गोळीबार करणाऱ्यांना पकडले जाईल, असे आश्वासन दिले.(Salman Khan’s House)
=================================
=================================
सलीम खान व्यतिरिक्त, ‘मैं और मिसेस खन्ना’ दिग्दर्शक आणि सलमान खानचे शेजारी, प्रेम राज सोनी यांनी इंडिया टुडेला सांगितले, ‘माझ्या माहितीनुसार, खान कुटुंब पूर्णपणे ठीक आहेत. सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. गोष्टी नियंत्रणात आहेत आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही.