Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

आर्यन-शाहरुख खानचं टेन्शन वाढलं! Sameer Wankhede यांनी केला अब्रुनुकसानीचा दावा; त्या सीनमुळे उडाली खळबळ
२०२१ नंतर ता पुन्हा एकदा समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि दिग्दर्शक आर्यन खान (Aryan Khan) समोरासमोर आले आहेत… नुकतीच आर्यन खानची पहिली दिग्दर्शकिय वेब सीरीज The Ba***ds of Bollywood नेटफ्लिक्सवर रिलीज झाली… यात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा दावा स्वत: समीर यांनी केला असून त्यांनी शाहरुख आणि गौरी खान व त्यांच्या मालकीची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सला थेट हाय कोर्टात खेचलं आहे… समीर वानखेडे यांनी गौरी खान आणि इतर सहभागी कंपनीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत २ कोटींची मागणी केली आहे… (Shah rukh Khan and gauri khan)

मिळालेल्या माहितीनुसार, The Ba***ds of Bollywood या सीरीजमध्ये समीर वानखेडे यांच्या सारखे दिसणारे पात्र असल्यामुळे वाद उद्भवला आहे… २०२१ मध्ये आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेणाऱ्या समी वानखेडेंचं पात्र यात दाखवलं असून त्यासोबतच सीरीजमध्ये खोटं चित्रिकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे… समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, ‘या शोमुळे अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे लोकांचा कायदा अंमलबजावणी संस्थावरील विश्वास कमी झाला असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, याचिकेत असंही म्हटलंय की, The Bas***ds of Bollywood या सीरीजची निर्मिती वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानेच करण्यात आली आहे… अजूनही २०२१ मधील समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्यांशी संबंधीत प्रकरण मुंबई हायकोर्टात आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. आणि असं असतानाही हा शो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला हे चुकीचं आहे, असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे… (Sameer wankhede moves to delhi high court)

तसेच, समीर वानखेडे यांनी २ कोटींची केलेली नुकसानभरपाईची रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी दिली जाईल, असा प्रस्ताव वानखेडे यांनी मांडला आहे. शिवाय शाहरुख आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेज चिलीज एंटरटेन्मेंट प्रा. लि., ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि अन्य लोकांविरोधात स्थायी किंवा कायमस्वरुपी मनाई आदेश आणि नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. आता हाय कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे…

रेड चिलीज प्रोडक्शन हाऊस (Red Chillies production house) ही एक फिल्म आणि व्हीएफएक्स कंपनी असून शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालिकीची ही संस्था आहे… २००२ मध्ये या संस्थेची सुरुवात झाली असून आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती या प्रोडक्शन हाऊसने केली आहे… सुरुवातीला शाहरुख खान, जुही चावला आणि अजिज मिर्झा यांनी सुरुवात केलेल्या Dreamz Unlimited या नावाने सुरु असणाऱ्या कंपनीने ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘अशोका’, ‘चलते चलते’ चित्रपटांचीही निर्मिती केली होती… कालांतराने २००२ मध्ये रेड चिलीज असं या कंपनीचं नाव बदलण्यात आलं आणि २००४ मध्ये रेड चिलिजच्या बॅनर अंतर्गत ‘में हु ना’ Main Hoo Naa) हा पहिला चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला… आजवर Red Chillies ने ‘डंकी’, ‘जवान’, ‘भक्षक’, ‘The Bas***ds of Bollywood’, ‘डार्लिंग्स’, ‘बदला’, ‘झिरो’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘दिलवाले’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘Ra-one’, ‘बिल्लू’, ‘पहेली’ अशा बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे…
================================
हे देखील वाचा : ‘हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही…..’
=================================
काय होतं २०२१ ड्रग्ज प्रकरण?
२ ऑक्टोबर २०२१ रोजी समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असताना त्यांनी आर्यन शाहरुख खान याला कॉर्डिलिया क्रूझवरून अटक केली होती. त्याच्याकडे अमली पदार्थ आढळल्याचा दावा त्यांनी केला होता. अटकेनंतर आर्यन खान याला २५ दिवस तुरुंगवनास भोगावा लागला होता.. दरम्यान या कारवाईवर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव असल्याचा आरोप करतसमीर वानखेडे यांनी सेलिब्रिटींना जाणीवपूर्वक ड्रग्जच्या प्रकरणात अडकवले होते, असाही दावा त्यांनी केला होता. (Sameer Wankhede And Aryan Khan drugs case)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi