Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ‘सामना’

 स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ‘सामना’
कलाकृती विशेष

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ‘सामना’

by Kalakruti Bureau 18/04/2021

‘सामना’ (Samna) या चित्रपटाला ४७ वर्षे उलटली तरीही त्यातील राजकीय संदर्भ आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. तेव्हा घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आजही आजूबाजूला दिसतात. त्या घटनांशी आपण आजही स्वतःला जोडू शकतो. हा चित्रपट आजच्या पिढीलाही पाहावासा वाटतो, हे या चित्रपटाचे यश आहे, अशा भावना वात्रटीकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केल्या. या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय लेखक विजय तेंडुलकरांचे आहे, असे सांगताना या चित्रपटासाठी कलाकारांची निवड आधी झाली व त्यानंतर या चित्रपटाची कथा लिहिली गेली, ही आठवण फुटाणे यांनी यावेळी आवर्जुन सांगितली. या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी तेंडुलकर तयार नव्हते. पण तयार झाल्यावर मग त्यांनी ग्रामीण भागात फिरून सहकारी चळवळींचा आणि ग्रामीण राजकारणाचा देखील अभ्यास केला.

नंदू माधव यांनी लहानपणी जत्रेत पाहिलेल्या एका चित्रपटाचे वर्णन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या प्रभावाचे  उल्लेख या चित्रपटामध्ये केले. निळू फुले (Nilu Phule), डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) या चळवळीतील मंडळींचा हा सिनेमा असल्याने तो चळवळीचा चित्रपट असल्याचे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले. जब्बार पटेल यांचा दिग्दर्शन केलेला सामना हा अर्थातच पहिला चित्रपट होता. यानंतर जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांनी ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘एक होता विदुषक’, ‘मुक्ता’ आणि ‘डॅा. बाबासाहेब आंबेडकर’ असे वेगवेगळे विषय असलेले चित्रपट दिग्दर्शन केले.

Samna
Samna Movie

जब्बार पटेल हे त्या काळामध्ये एक प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक म्हणून गाजत होते. काशिराम कोतवालच्या एका शो दरम्यान रामदास फुटाणे यांनी पटेल यांना आमच्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम कराल का असे विचारले. त्यावेळी चित्रपट हे नाटकापेक्षा थोडे वेगळे असतात, असे कारण देत पटेल यांनीसुद्धा तेंडूलकर यांच्याप्रमाणेच सुरुवातीला फुटाणे यांना चित्रपटासाठी नकार दिला होता. पण नंतर पटेल यांना चित्रपटासाठी लागणारा अनुभव नसतानाही फुटाणे यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे शेवटी जब्बार पटेल यांनी दिग्दर्शनासाठी  होकार दिला.

सामना या नावामागे पण एक किस्सा आहे. १९७३ मध्ये स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचे लेखक विजय तेंडूलकर (Vijay Tendulkar) यांनी चित्रपटासाठी अगोदर ‘सावलीला तू भिऊ नकोस’ असे नाव सुचवले होते. पण रामदास फुटाणे यांना ते नाव नाटकाप्रमाणे वाटले. मग ते बदलून ‘सामना’ असे ठेवण्यात आले.

शब्दांकन – शामल भंडारे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Classic movies Entertainment Marathi Actor Marathi Movie Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.