Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळेची दमदार एंट्री !
‘सनई चौघडे’ (Sanai Choughade Serial ) या झी मराठीवरील नव्या मालिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे ( Raj Hanchanale) एक वेगळ्या अंदाजातील नायक साकारताना दिसणार आहे. ‘जय खानोलकर’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून तो एकाच वेळी कणखर, आत्मविश्वासी आणि भावनिक असा स्वभाव असलेला पात्र प्रेक्षकांसमोर आणणार आहे. जय खानोलकर ही व्यक्तिरेखा बाहेरून कठोर आणि थोडी रागीट वाटणारी असली तरी त्याच्या मनात संवेदनशीलता आहे. आपल्या आयुष्यातील काही निवडक व्यक्तींना तो खूप महत्त्व देतो. विशेषतः त्याची आजी, आई आणि बहीण या तीन स्त्रिया त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या आहेत. शून्यातून स्वतःच्या मेहनतीवर उभं राहिलेला जय कामाबाबत अत्यंत प्रामाणिक, स्पष्ट बोलणारा आणि शिस्तप्रिय असा दाखवण्यात आला आहे. त्याच्या भूतकाळाशी आणि आयुष्यातील अनेक रहस्यांशी संबंधित गोष्टी मालिकेच्या कथानकात पुढे उलगडत जाणार आहेत.(Sanai Choughade Zee Marathi Serial)

या भूमिकेबद्दल बोलताना राज म्हणाला, ‘या भूमिकेसाठी माझी निवड झाली म्हणजे मला प्रॉडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी कॉल आला. हे ऐकून मला खूप उत्सुकता वाटली. मला तिने सांगितलं की राजू सावंत डीरेक्टर आणि प्रोड्युसर आहे आणि ही आमच्या प्रोडक्शन ची पहिली सिरीयल आहे आणि प्लस ती झी मराठीवर आहे, सो हे कॉम्बिनेशन… एकदम भन्नाट वाटलं. मी पहिलं ऑडिशन घरातून पाठवलं आणि ते सगळ्यांना आवडलं. त्यानंतर मला सेटवर तीन-चार राऊंडसाठी बोलावण्यात आलं सह कलाकारानं सोबत ऑडिशनसाठी.’ तो पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण या आधी साधारण एक-दोन ऑडिशनमध्ये माझी निवड होत असे, या भूमिकेसाठी मात्र चार-पाच ऑडिशन झाले. तेव्हा थोडे प्रश्न मनात आले, पण आता मागे वळून पाहताना वाटतं की योग्य कलाकार निवडण्यासाठी त्यांनी काटेकोर प्रयत्न केले. त्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला आनंद आहे.’

जय खानोलकर ही व्यक्ती प्रभावी आणि रुबाबदार दिसावी यासाठी राजने या भूमिकेवर विशेष मेहनत घेतली आहे. त्याने आपल्या बॉडी लँग्वेज, चालण्याची शैली, ॲटिट्युड आणि स्क्रीन प्रेझेन्स यावर काम केलं आहे. मेहनतीने उभं केलेलं स्वतःचं साम्राज्य सांभाळणारा जय अधिकारपूर्ण दिसावा यासाठी त्याने दिग्दर्शकांसोबत चर्चा करत व्यक्तिरेखेतील बारकावे विकसित केले. कठोर स्वभावामागे दडलेली त्याची भावनिक बाजूही प्रेक्षकांना जाणवणं महत्त्वाचं असल्याचं राजने सांगितलं.(Sanai Choughade Zee Marathi Serial)
===============================
===============================
मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. विशेषतः “स्वामींची इच्छा” हा संवाद आणि “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” ही ओळ सोशल मीडियावरही चर्चेत आली आहे. दमदार व्यक्तिमत्त्व, स्टाईल आणि भावनिक छटा असलेला जय खानोलकर प्रेक्षकांना नवा अनुभव देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.