
‘संगीत देवभाबळी’ फेम शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांचा घटस्फोट !
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटी घटस्फोट ही काही नवीन बाब नाही. मात्र, आता या लाटेचा परिणाम मराठी मनोरंजन विश्वातही जाणवू लागला आहे. नुकताच सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी लग्नाच्या १७ वर्षांनी पत्नीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट झाला आहे. ‘संगीत देवभाबळी’ नाटकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते (Actress Shubhangi Sadavarte) आणि सुप्रसिद्ध संगीतकार आनंद ओक (Musician Anand Oak) यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. (Actress Shubhangi Sadavarte Divorce)

या निर्णयाने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक यांनी २०२० साली विवाहबंधनात अडकले होते. रंगभूमीवर गाजणाऱ्या या जोडीने एकत्र काम करताना प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु लग्नाच्या अवघ्या पाच वर्षांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आनंद ओक यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गोष्टीची माहिती दिली.आनंद ओक यांची पोस्टइन्स्टाग्रामवर लिहिताना आनंद ओक म्हणाले, “आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण हा निर्णय जाहीर करण्यासाठी आत्ता योग्य वेळ आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे. तिच्या भविष्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. भविष्यात संधी मिळाल्यास आम्ही पुन्हा एकत्र काम करू.”या पोस्टनंतर चाहत्यांनी आश्चर्य आणि दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी शुभांगी आणि आनंद या दोघांनाही उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Actress Shubhangi Sadavarte Divorce)
===============================
हे देखील वाचा: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !
===============================
शुभांगी सदावर्ते सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘संगीत देवभाबळी’ नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तिच्या अभिनयामुळे हे नाटक महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल सुरू आहे. तर आनंद ओक यांनी याच नाटकाला संगीत दिलं आहे. प्राजक्त देशमुख दिग्दर्शित हे नाटक सुरुवातीला काही प्रयोगांनंतर बंद करण्यात आलं होतं, मात्र प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ते पुन्हा सुरु करण्यात आल.