Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर; ‘सयाजी शिंदे’ साकारणार विजय तेंडुलकरांची गाजलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रूपात रंगमंचावर !

 Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रूपात रंगमंचावर !
नाट्यकला मिक्स मसाला

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रूपात रंगमंचावर !

by Team KalakrutiMedia 27/06/2025

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं प्रसिद्ध नाटक ‘संगीत संन्यस्त खड्ग’ आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ८ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. याबाबत माहिती सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आणि या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केली असून, स्वा. सावरकरांचे विचार आणि साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. याच उद्देशाने हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणलं जात आहे. (Savarkars Sangeet Sannyast Khadag)

Savarkars Sangeet Sannyast Khadag

हे नाटक महाराष्ट्रभर १०० ठिकाणी नेण्याचा मानस असून, तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे  ₹१००, ₹२०० आणि ₹३०० ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे नाटक आजच्या तरुण कलाकारांकडून सादर केलं जाणार आहे. या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर, दिग्दर्शक ऋषीकेश जोशी, आणि संगीतकार कौशल इनामदार आहेत.

Savarkars Sangeet Sannyast Khadag

ऋषीकेश जोशी म्हणाले, “या नाटकात अहिंसेच्या तत्त्वज्ञान आणि राष्ट्रहित यामधील द्वंद्व उलगडलं गेलं आहे. अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आजही तितकेच प्रभावी वाटतात.” नाटकात मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना अमोघ फडके, वेशभूषा मयूरा रानडे, नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे, रंगभूषा श्रीकांत देसाई, आणि सूत्रसंचालन दीपक गोडबोले यांनी केलं आहे.(Savarkars Sangeet Sannyast Khadag)

==============================

हे देखील वाचा: GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !

==============================

८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात ब्रिटिश जहाजातून उडी मारून इतिहास घडवला होता. त्या दिवशीच या नाटकाचा शुभारंभ ठरवण्यात आला आहे. या नाटकाची मूळ रंगभूमीवरची मांडणी १९३१ मध्ये दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती. या नाटकातील ‘शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’ यांसारखी गाणी त्यांनी गायली आणि अजरामर केली होती. नव्या पिढीला सावरकरांचा ठसा देणारं हे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सावरकर दर्शन प्रतिष्ठानने केला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anant Panshikar director Rishikesh Joshi Entertainment Ketki Chaitanya Mayura Ranade music composer Kaushal Inamdar Omkar Kulkarni Omprakash Shinde Rishikesh Joshi Sangeet Sannyast Khadag natak Savarkars Sangeet Sannyast Khadag
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.