‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Sanjay Dutt च्या मुलीला पाहून लोकं म्हणाले, “नर्गिसजी परत आल्या…”
शाहरुख खान (Shah Rukh Khan), सैफ अली खान, ह्रतिक रोशन या बॉलिवूडच्या सुपरस्टार्सची मुलं अगदी त्यांच्यासारखी तंतोतंत दिसतात… बऱ्याचदा लोकं असंही म्हणतात की त्यांनी खरोखरीच आपल्या हुबेहुब व्यक्तीला जन्म दिलाय… पण सध्या एक मुलगी सोशल मिडियावर व्हायरल होतेय.. तिचे लूक्स आणि डोळे पाहून नर्गिस (Nargis) यांची आठवण येतेय… एव्हाना तुम्हाला सजमलं असेलच की ती दुसरी तिरी कुणी नसून संजय दत्तची मुलगी इकरा दत्त (Iqra Dutt) आहे…(Bollywood News)

सध्या सोशल मिडियावर इकरा संजय दत्त हिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत.. यात इकराचे डोळे, चेहऱ्याचा रंग पाहून लोकांना तिची आजी नर्गिस दत्त यांची आठवण येत आहे. लोकांनी तिच्या व्हिडिओजवर कमेंट करत, “असे दिसते की नर्गिसजी परत आल्या आहेत.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने विनोदात अलं लिहिलंय की, “काही मुलांना डीएनए चाचणीची आवश्यकता नसते…” तर दुसऱ्याने तिचे कौतुक केले, “ती खूप सुंदर दिसत आहे,” असे म्हटले.(Entertainment)
================================
हे देखील वाचा : ती पहिली भेट… आणि शेवटी नर्गिस बनली बायको
=================================
दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीचा ब्लॅक एन्ड व्हाईट काळ आपल्या रंगीत अभिनयाने अजरामर करणाऱ्या नर्गिस यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं… ‘तकदीर’, ‘आग’, ‘मदर इंडिया’, ‘अंदाज’, ‘मीना बाजार’, ‘बेवफा’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘बाबूल’, ‘मेला’, ‘श्री ४२०’, ‘परदेसी’, ‘चोरी चोरी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…(Nargis Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi