Double Ismart OTT: संजय दत्त यांचा ‘डबल ईस्मार्ट’ ओटीटीवर प्रदर्शित; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल
१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या डबल इस्मार्ट या चित्रपटात राम पोथिनेनी, काव्या थापर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात अॅक्शन आणि जबरदस्त व्हीएफएक्स असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकलेला नाही. एकीकडे स्त्री २ ची बॉक्स ऑफिसकमाई थांबण्याचे नाव घेत नाही आणि दुसरीकडे संजय दत्त आणि राम पोथिनेनी यांचा डबल एस्मार्ट हा चित्रपट आता अचानक २५ दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित ही झाला आहे. प्राइम व्हिडिओने तेलगू अॅक्शन सायन्स-फिक्शन थ्रिलर – डबल आयस्मार्टच्या ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची तारीख 5 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.(Double Ismart OTT)
पुरी कनेक्ट्सच्या बॅनरखाली पुरी जगन्नाथ लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटात सयाजी शिंदे, काव्या थापर आणि बानी जे. सारखे कलाकार महत्वाच्या भुमिकेत पहायला मिळत आहेत. डबल इस्मार्ट आजपासून प्राइम व्हिडिओवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये भारत आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.
‘डबल इस्मार्ट ‘ हा 2024 चा भारतीय तेलुगू भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे, ज्यांनी पुरी कनेक्ट्स अंतर्गत चार्मी कौरच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात काही खास दाखवू शकला नाही. आता तो ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात संजय दत्त , बिग बुलच्या महत्वाच्या भूमिकेत आहेत, तर राम पोथिनेनी ‘ईस्मार्ट’ शंकर उर्फ डबल ईस्मार्टच्या भूमिकेत दिसणार आहे.
============================
हे देखील वाचा:
============================
बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर ९० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या डबल ईस्मार्टने २५ दिवसांत ४० कोटींचा टप्पा गाठला. तर निर्मात्यांना ५० कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, बॉक्स ऑफिसट्रॅकर सकनिकच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.३५ कोटींची कमाई केली होती, त्यापैकी तेलुगूमध्ये ६.९ कोटी आणि हिंदीमध्ये ४५ लाखांची कमाई या चित्रपटाने केली होती. तर दुसऱ्याच दिवशी हा आकडा सव्वा दोन कोटींवर पोहोचला. तर भारतात या चित्रपटाचे कलेक्शन केवळ ९.६० कोटींवर पोहोचले आहे. यानंतर या कमाईत घट झालेली पहायला मिळाली.