
Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
हिंदी चित्रपटसृष्टीचा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ गाजवणारा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘बाजीगर’, ‘डर’, ‘करण-अर्जून’, ‘अंजाम’ अशा प्रत्येक चित्रपटात त्याची एक वेगळीच बाजू कायम दिसली. मात्र, ‘देवदास’ हा २००२ साली आलेला चित्रपट त्याच्यासाठी विशेष ठरला. तुम्हाला माहित आहे का? शाहरुखच्या ‘देवदास’ या एक चित्रपटामुळे मुंबईत शेकडो लग्न रद्द केली होती. इतकंच नाही तर देवदास चित्रपटासाठी शाहरुख नाही तर वेगळ्याच अभिनेत्याची पसंती दिग्दर्शकाने केली होती. जाणून घेऊयात ‘देवदास’ (Devdas) चित्रपटाचे काही खास किस्से…
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) म्हटलं की Grandeur आलंच. मोठे सेट्स, झगमगता प्रकाश, पारंपारिक वेशभूषा अशी सगळीच भव्यता एका चित्रपटात किंवा एखाद्या ठराविक गाण्यामध्येही भन्साळी घेऊन येतात. शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित ‘देवदास’ चित्रपटाची कथा आहे हे आपल्याला माहित आहेच. पण या एका चित्रपटामुळे मुंबईत शेकडो लग्न रद्द करण्यात आली होती त्याचा एक ख़ास किस्सा माहित आहे का? (Untold stories)

तर झालं असं की, मुंबईत १ किलोमीटर लांब असा ‘देवदास’चा (Devdas) सेट तयार करण्यात आला होता. सेट मोठा असल्यामुळे अधिक लाईट्सची गरज सेटवर भासत होती. तेव्हा, जनरेटर फ़ार वापरले जात होते आणि इतक्या लाईट्स लागणार म्हणजे जनरेटर चित्रपटांच्या सेटवर असायचंच. बरं त्यावेळी लग्नातही जनरेटर्सचा वापर केला जायचा. पण देवदास या एका चित्रपटासाठी मुंबईतील जवळपास सगळेच जनरेटर सेटवर आणल्यामुळे मुंबईत होणारी बरीचशी लग्न पुढे ढकलावी लागली होती. (Bollywood masala)
============
हे देखील वाचा : Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
संजय लीला भन्साळींनी ‘देवदास’ चित्रपट २००२ मध्ये करण्यापूर्वी १९५५ मध्ये बिमल रॉय यांनी ‘देवदास’ चित्रपट केला होता; ज्यात देवच्या भूमिकेत दिलीप कूमार, चंद्रमुखीच्या भूमिकेत वैजयंती माला आणि पारोच्या भूमिकेत सुचित्रा सेन हे कलाकार होते. त्यानंतर २००२ मध्ये भन्साळींनी पुन्हा ‘देवदास’ चित्रपट तयार केला. पण शाहरुखच्या आधी देवबाबूची भूमिका सलमान खान (Salman Khan)याला ऑफर केली होती. मात्र, भन्साळी आणि सलमान यांचं समीकरण न जुळल्यामुळे देवबाबूच्या भूमिकेत शाहरुख दिसला. इतकंच नाही तर, जॅकी श्रॉफ यांनी साकारलेली चुन्नी बाबूची भूमिका आधी गोविंदा, मनोज बाजपेयी आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना ऑफर झाली होती. (Entertainemnt)

‘देवदास’ हा संजय लीला भन्साळी यांचा पहिला बिग बजेट चित्रपट होता. चंद्रमुखी जिथे राहात होती तो सेट तयार करण्यासाठी १० कोटींपेक्षा अधिक खर्च केला होता. तर, पारो ही भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्यासाठी (Aishwarya Rai) ६०० पेक्षा अधिक साड्या तयार करुन घेतल्या होत्या. शिवाय, काहे छेड़ छेड़ मोहें.. या गाण्यात माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) ३० किलोंचा आऊटफिट परिधान केला होता. तर, डोला रे डोला या गाण्यात ऐश्वर्याने इतके जड कानातले घातले होते की शुट करताना तिच्या कानातून रक्त येत होतं पण तरीही तिने शुट पुर्ण केलं होतं. तसेच, ‘देवदास’ने यशाचं मोठं शिखर गाठून BAFTA Awards मध्ये नॉमिनेशन देखील मिळवलं होतं. (Devdas Movie)

‘देवदास’चं त्यावेळी बजेट ५० कोटी होतं. असं म्हटलं जातं की २००० सालात तयार झालेला हा सर्वात महागडा चित्रपट होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने देशात ५५ कोटींच्या पुढे आणि जगभरात १६८ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. २००२ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) प्रीमियर करण्यात आलेला देवदास जुलै २००२ मध्ये जगभरात प्रदर्शित झाला होता.