Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Mahavatar Narsimha Movie: नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘पाच भाषणांमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanjay Leela Bhansali : “आज मै उपर आसमां नीचे आज मै आगे जमाना है पीछे “

 Sanjay Leela Bhansali : “आज मै उपर आसमां नीचे आज मै आगे जमाना है पीछे “
बात पुरानी बडी सुहानी

Sanjay Leela Bhansali : “आज मै उपर आसमां नीचे आज मै आगे जमाना है पीछे “

by धनंजय कुलकर्णी 09/05/2025

नव्वदच्या दशकामध्ये पुन्हा एकदा हिंदी चित्रपटातील संगीत सदाबहार बनू लागलं होतं. या काळातील  गाणी पुन्हा एकदा मेलडीस होत होती. ‘आशिकी’, ‘दिल है के मानता नही’, ‘साजन’, ‘दिल…’  आज नव्वदच्या दशकातील संगीत ऐकणारा एक वेगळा रसिक वर्ग तयार झाला आहे. या दशकातील गाणी आजही रसिकांमध्ये चर्चेचा वेगळा विषय असतो. या दशकात अनेक म्युझिकल हिट सिनेमे आले. या काळात चित्रपटाला संगीत देताना अनेक पैलूंचा विचार होऊ लागला. (Khamoshi : The Musical)

भारतीय चित्रपट संगीत हे अधिकाधिक प्रगल्भ आणि चित्रपटाच्या कथानकाला सोबत घेऊन जाणार बनू लागलं. याचा प्रत्यय संजय लीला भन्साळी (Sanjay leela bhansali) यांच्या दिग्दर्शनातील पहिल्याच चित्रपटात आला. चित्रपट होता ‘खामोशी द म्युझिकल’. हा चित्रपट १९९६ साली  प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपूरी  यांनी लिहिली होती तर चित्रपटाला संगीत जतीन ललित यांनी दिले होते. या चित्रपटात कविता कृष्णमूर्ती हिने एक गीत गाताना खूप अभ्यास करून गायले होते. कारण या चित्रपटाच्या कथानकाची या गाण्याचा खूप जवळचा संबंध होता. या चित्रपटात हे गाणे नायिका मनीषा कोइरालावर चित्रित झाले होते. हे गाणे गायले होते कविता कृष्णमूर्ती यांनी. (Entertainment news)

=================

हे देखील वाचा : Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!

=================

चित्रपटातील कथानकात मनीषा कोइरालाचे आई-वडील नाना पाटेकर आणि स्मृती विश्वास दाखवले आहेत जे जन्मतः मूकबधिर असतात. या गाण्याच्या सिच्युएशनमध्ये मनीषा एका स्टेज शोमध्ये हे गाणे गात असते. समोर आई वडील बसलेले असतात. ते मूक बधीर असल्याने आपल्या लेकीचे गाणे ऐकायला येणे शक्यच नसते. साईन लैंग्वेज मधून ती आपल्या भावना आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवत असते. खूप कठीण काम होतं.नायिका  मनीषा कोइराला आणि गायिका कविता कृष्णमूर्ती या दोघींनीही खूप मेहनत करून हे गाणं तयार केलं.  (Bollywood tadaka)

संजय लीला भन्साली यांचा हा चित्रपट त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट असल्यामुळे ते देखील चित्रपटाच्या प्रत्येक पैलू कडे खूप बारकाईने पाहत होते. या गाण्याचे बोल होते ‘ये दिल सुन रहा है….’  आज देखील आपण हे गाणे you tube वर पाहिल्यानंतर मनीषाने या गाण्यासाठी किती मेहनत घेतली हे आपल्या लक्षात येतं. या चित्रपटांमध्ये सलमान खान, मनीषा कोइराला, नाना पाटेकर, सीमा विश्वास, हेलन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मजरूह  सुलतानपुरी यांचे वय या चित्रपटाच्या वेळी ७५ पेक्षा जास्त होते पण त्यांनी तरुणाईला आवडतील अशी गाणी या चित्रपटाची लिहिली होती. या चित्रपटात तब्बत १०  गाणी  होती. चित्रपट सर्वांग सुंदर बनला होता. पण पहिल्या रनला या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. नंतर मात्र एक कल्ट क्लासिक म्हणून या चित्रपटाची गणना झाली. (Bollywood classic movies)

या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती ने गायलेल्या “आज मै उपर आसमा नीचे….” या गाण्याला त्या वर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. जतिन ललित आणि कविता कृष्णमूर्ती या कॉम्बिनेशन चे अनेक गाणे नव्वद  च्या दशकामध्ये प्रचंड झाले जतिन ललित यांचा पहिला चित्रपट ‘यारा  दिलदारा’ या चित्रपटात उदित नारायण सोबत कविता कृष्णमूर्तीने ‘ बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी आना ही पडा सजना जालीम है दिल की लगी…’  प्रचंड गाजलं होतं. चित्रपट चालला ‘खूबसूरत’  या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांची गाणी खूप गाजली. (Entertainment update)

================================

हे देखील वाचा: Dharmendra : धर्मेंद्रच्या तीन दशकातील तीस नायिका!

=================================

‘खामोशी द म्युझिकल’ हा चित्रपट काळाच्या पुढचा होता. एक वेगळा प्रयोग संजय लीला भन्साळी (Sanjay leela bhansali) यांनी या चित्रपटातून केला होता.या सिनेमाला फिल्मफेअरची आठ नामांकने मिळाली होती. पैकी सर्वोत्कृष्ट नायिका (मनीषा कोईराला), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (कविता कृष्ण मूर्ती) सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक (नितीन चंद्रकांत देसाई) सर्वोत्कृष्ट ध्वनी ( जितेंद्र चौधरी) हि पारितोषिके मिळाली! (Bollywood)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Classic movies Entertainment khamoshi the musical Manisha Koirala nana patekar salman khan Sanjay Leela Bhansali
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.