
Sanjay Leela Bhansali : ‘लव्ह अॅण्ड वॉर’मध्ये रणबीर-विकीची काटें की टक्कर!
भव्य-दिव्य सेट, हिरे, मोती, सोण्यांनी नटलेल्या अभिनेत्री, ग्रॅण्ड चित्रपट म्हटलं की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. हिरामंडी या वेब सीरीजनंतर आता लवकरच संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ (Love And War) हा चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शुटींग मुंबईमध्ये सुरु आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी…(Bollywood upcoming film)
तर ‘लव्ह अॅण्ड वॉर’ चित्रपटाच्या नावाप्रमाणेच दोन स्ट्रॉंग हेडेड पात्रांच्या भूमिका विकी (Vicky Kaushal) आणि रणबीर (Ranbir Kapoor) साकारणार असं दिसून येत आहे. यात आलिया भट्ट (Alia Bhatt)अभिनेत्री असणार आहे. तसं पाहायला गेलं तर रणबीर आणि विकीमध्ये कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हा समान धागा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावावरून दोघेही अभिनेते रिअल लाईफ चित्रपटात दाखवणार आहेत की काय असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.(Bollywood gossip)

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांनी संपूर्णपणे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींकडे स्वत:ला सुपूर्द केलं असून एक नवं त्रिकूट आणि भन्नाट कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार असं नक्कीच दिसून येत आहे. सध्या या चित्रपटाचं शुटींग सुरु असून २०२६ मध्ये ‘लव्ह अॅण्ड वॉर’ (Love And War) हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती सध्या मिळत आहे. (Entertainment news)
==================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
भन्साळींच्या ‘लव्ह अॅण्ड वॉर’ चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विकी आणि रणबीच्या अभिनयाबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले होते की, दोघेही इतका कमाल अभिनय करत आहेत की त्यांची पात्र म्हणजे बर्फ आणि आगीची टक्कर होत असल्याचं भासतं. दरम्यान, रणबीरने ‘अॅनिमल’ (Animal) आणि विकीने ‘छावा’ (Chhaava) हे दोन्ही ५०० कोटींच्या पुढील ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून आता दोघे एकत्र आल्यावर काय धमाका होणार? आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन दुप्पट होणार का? हे आता २०२६ मध्येच कळेल.