Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

‘गंगूबाई काठियावाडी’साठी Alia Bhatt नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली चॉईस;राष्ट्रीय पुरस्कारावरही कोरलंय नाव
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year movie) चित्रपटातून २०१२ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं… दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची मुलगी असल्यामुळे नेपोकिड असणाऱ्या आलियाला सुरुवातीला तिच्या अभिनयावरुन डिवचलं गेलं… मात्र, नंतर प्रत्येक चित्रपटातून तिने आपल्या अभिनय शैलीला उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि परिणामी संजय लीला भन्साळींचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiyawadi movie) या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला… आलिया भट्ट खऱ्या अर्थाने त्या भूमिकेत शिरली होती हे आपण पाहिलं आणि अनुभवलं आहेच… पण तुम्हाला माहित आहे का गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट नाही तर एक वेगळीच अभिनेत्री पहिली पसंती होती… कोण होती ती अभिनेत्री जाणून घेऊयात…(Bollywood news)

गायक आदित्य नारायण यांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत याबद्दल खुलासा केला की, ‘शापित’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो बेरोजगार झाला होता आणि त्याच्याकडं कोणतेही काम नव्हतं. त्यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळींसोबत (Sanjay Leela Bhansali) सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. भन्साळींचा सुरुवातीला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट आलियासोबत नाही तर ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जीला (Rani Mukherjee) घेऊन बनवायचा होता”… त्यावेळी भन्साळींकडे रामलीला आणि गंगुबाई या दोन चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स होत्या… मात्र, पहिली पसंती ‘राम-लीला’ (२०१३) चित्रपटाला दिली आणि त्यानंतर ‘गंगूबाई काठियावाडी’ (२०२२) चित्रपट तयार करण्यात आला…
================================
हे देखील वाचा : राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ‘त्या’ व्हिडिओने वेधलं लक्ष
=================================
दरम्यान, नुकताच राणी मुखर्जी हिला Mrs. Chatterjee vs Norway या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला… ३० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या राणी मुखर्जीला इतक्या वर्षांनी तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे… तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिचा ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २७ फेब्रुवारी २०२६ मध्ये येणार आहे… २०१४ मध्ये ‘मर्दानी’ हा पहिला भाग आला होता आणि त्यानंतर चित्रपटाला यश मिळाल्यामुळे २०१९ मध्ये ‘मर्दानी २’ रिलीज झाला होता… आणि आता पुन्हा एकदा तब्बल ७ वर्षांनी राणी मुखर्जी सिनियर इन्सपेक्टर शिवानी रॉय या भूमिकेत दिसणार आहे… तसेच, शाहरुख खान आणि सुहाना खान यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘किंग’ (King Movie) चित्रपटातही राणी मुखर्जी दिसणार असून २००६ मध्ये आलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटानंतर हे दोन कलाकार २० वर्षांनी स्क्रिन शेअर करणार आहेत… (Rani Mukherjee movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi