Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
Santosh Juvekar : ‘छावा’मध्ये संतोषने अभिनयासोबत डायलॉग्जही लिहीले; कारण….
२०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘छावा’ (Chhaava) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रसिक प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबतच बॉक्स ऑफिसवरही छावा चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. ६०० कोटींचा यशस्वी टप्पा पार करणारा हा या वर्षाचा पहिला चित्रपट ठरला आहे. सगळीकडे छावा चित्रपटाचीच चर्चा सुरु असून यात अनेक मराठी कलाकारांच्या उत्तम अभिनयाचा देखील सहभाग आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘छावा’ चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकरही विशेष भूमिकेत झळकला आहे. केवळ चित्रपटात अभिनयापुरतंच आपलं योगदान न देता संतोषने छावा चित्रपटात संवादही लिहिले आहेत. जाणून घेऊयात याबद्दल… (Chhaava)
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा ‘छावा’ च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. शिवाय प्रत्येक कलाकाराने केलेलं काम चित्रपटाच्या यशात मोलाचा वाट देणारं आहे. संतोष जुवेकर याने अभिनयासोबत संवाद लिहिल्याचं न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. संतोष म्हणाला की,”लक्ष्मण सरांनी आम्हाला स्क्रिप्ट वाचताना सांगितलं होतं, की एखाद्या सीनमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की इथे हे वाक्य रायाजी बोलू शकतो तर मला सांगा. तर चित्रपटात जो सीन आहे, तर मी अनेकदा त्यांना काही वाक्य सुचवायचो. पण, ते त्यांना पटत नव्हते”. (Entertainment trending news)

पुढे संतोष म्हणाला, “चित्रपटात एक सीन आहे, जेव्हा महाराजांच्या मानेवर धाराऊ यांना घाव दिसतो. तेव्हा त्या म्हणतात, “ये क्या युवराज फिर से नजर उतारनी पडेगी”. त्यावेळेस मी सरांना म्हणालो की सर मला हे “अगं आऊ…. अख्ख्या स्वराज्याची नजर ज्याच्यावर आहे त्याला कोणाची नजर लागणार” हे एक सुचलंय. तर उतेकरांना ते वाक्य आवडलं आणि मला हे हिंदीत भाषांतरित करायला सांगितलं. तर मग त्यांना “अगं आऊ…” हे मराठीत घेऊ का विचारलं तर ते हो म्हणाले. मग “अगं आऊ…. पूरे स्वराज्य की नजर जिसपर है, उसे क्या किसी की बुरी नजर लगेगी” असं वाक्य मी सीनमध्ये घेतलं”, असा किस्सा संतोषने सांगितला. (Entertainment mix masala)
==================
हे देखील वाचा : Ranjana Deshmukh: “कुण्या गावाचं आलं पाखरू…” आठवणींतील रंजना!
==================
संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याने ‘छावा’ चित्रपटात रायाजींची भूमिका साकारली होती. तसेच, लक्ष्मण उतेकर यांच्या या ऐतिहासिक चित्रपटात सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर यांसह अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झालेला ‘छावा’ लवकरच तेलुगू भाषेसह मराठीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. (Chhaava movie)