Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Sarika आणि कमलहसन : अधुरी एक कहाणी !
हिंदी सिनेमातील हीरो हीरोइन यांचे प्रेम प्रकरण, त्यांचे लग्न आणि त्यांचे घटस्फोट… हे एक मसाला मनोरंजन आहे. अलीकडच्या काळात तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ याचे प्रमाण इतकं वाढलं आहे की विवाह हा प्रकार अश्मयुगीन वाटू लागला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ऐंशीच्या दशकामध्ये असेच एक लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण झाले होते. त्यात तर त्या अभिनेत्रीने आपल्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न केले होते!! ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं पण हे खर आहे. या अभिनेत्रीने मुलीला जन्म दिल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी तिचा वाढदिवस आला त्या दिवशी या अभिनेत्रीने लग्न केले होते. यातील दोन्ही कलाकार तुमच्या चांगलेच परिचयाचे आहेत. कोण होती ही अभिनेत्री आणि काय होत हा नेमका किस्सा? हे कलाकार होते अभिनेत्री सारिका (Sarika) आणि दक्षिणात्य सुपरस्टार कमाल हसन (Kamal Haasan).

अभिनेत्री सारिका हिचे हिंदी सिनेमात आगमन वयाच्या पाचव्या वर्षी झाले सुरुवातीला बालकलाकार म्हणून तिने काही चित्रपटातून भूमिका केले B. R. Chopra यांच्या ‘हमराज’ या चित्रपटातील बेबी सारिका यावा नावाने तिने साकारलेली बालकलाकाराची भूमिका खूप गाजली आणि नंतर अनेक सिनेमात ती बाल कलाकार म्हणून चमकत राहिली.

नायिका म्हणून ती पहिल्यांदा राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’ (१९७५) या चित्रपटात चमकली. तिचा नायक होता सचिन पिळगावकर. सचिन सारिका यांची त्या काळात खूप चांगली जोडी जमली. पण सारिका मात्र प्रेमात पडली होती भारतीय क्रिकेटपटूच्या. हा क्रिकेटपटू ज्याने १९८३ चा वर्ल्ड कपला जिंकून आणले होते. कपिल देव निखंज. पण हे प्रेम प्रकरण फार काही चाललं नाही. कपिल देवने रोमी भाटीयासोबत लग्न केले आणि सारिकासोबतची प्रेम कहाणी संपुष्टात आली.
यानंतर सारिका संपर्कात आली अभिनेता कमल हसनच्या. तेव्हा तो ऑलरेडी मॅरीड होता. वाणी गणपतीसोबत त्याने लग्न केले होते. पण सारिकाच्या मधाळ नजरेने तो घायाळ झाला आणि दोघे प्रेमात पडले आणि ते दोघे चक्क लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. वाणी सोबतचे त्याचे घटस्फोटाचे प्रकरण बरेच वर्षे चालले या काळात कमल हासन आणि सारीका यांनी त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. तारीख होती २८ डिसेंबर १९८६. या दिवशी श्रुती हसनचा जन्म झाला. त्यानंतर वाणी गणपती आणि कमल हसन यांचा घटस्फोट मंजूर झाला. दोघे कायद्याने सेपरेट झाले.

यानंतर या दोघांनी लग्न करायचे ठरवले. लग्न कोणत्या तारखेला करायचे यावर त्यांचा विचार सुरू झाला तेव्हा सारिकाने सांगितले आपण आपल्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न करू. त्याप्रमाणे २८ डिसेंबर १९८८ या दिवशी सारिका आणि कमल हसन यांचे लग्न झाले. पुढे १९९९० साली सारिकाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला अक्षरा हसन. आज या दोन्ही मुली अभिनयाच्या क्षेत्रात आलेल्या आहेत. पण सारिकाचे वैवाहिक जीवन फारसे आनंदी राहिले नाही.
==============
हे देखील वाचा : ghajini च्या मुख्य भूमिकेसाठी आमीर खानने सलमानचे नाव सुचवले होते ?
==============
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि २००२ साली ते दोघे विभक्त झाले श्रुती हसन सारिकाकडे तर अक्षरा कमल हसनकडे अशी विभागणी झाली. २००५ साली कमल हसने गौतमी सोबत लग्न केले. सारिका मात्र आता आपल्या मुलीच्या करिअरकडे लक्ष द्यायचे ठरवले छोटासा ब्रेक घेऊन ती पुन्हा सिनेमा आणि ओटीटीकडे वळाली. एक गुणी अभिनेत्री प्रेमात काय पडली आणि स्वतःचं करियर बरबाद करून बसली.