Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Vishnudas Bhave : मराठी रंगभूमीवरील पहिल्या ‘सीता स्वयंवर’ नाटकामुळेच घडला इतिहास….
मराठी प्रेक्षकांना मनोरंजनासाठी कुठल्याही माध्यमातील कलाकृती पाहायला आवडते; पण खऱ्या अर्थाने मराठी रसिक प्रेक्षक हे नाटकवेडे आहेत यात तिळमात्र शंका नाही… कितीही बड्या कलाकारासोबत चित्रपटात काम केल्यानंतर स्वत:ला पारखण्यासाठी कलावंत पुन्हा आपल्या रंगभूमीकडे वळतात आणि तिथेच कलाकार अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून घडतात… आज ५ नोव्हेंबर म्हणजेच मराठी रंगभूमी दिन… मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक आजच्या दिवशी नाटककार विष्णुदास भावे यांनी साकारलं होतं आणि त्याचनिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो…
विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक मानलं जातं… आणि त्यांनीच १८४३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ हे नाटक सादर करत नाट्यसृष्टीचा पाया रचला होता… कालांतराने १९४३ मध्ये शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता… यावेळी ५ ते ७ नोव्हेंबर १९४३ मध्ये नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि या संमेलनाचं अध्यक्षपद स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भूषवलं होतं… याचवेळी विष्णुदास भावेंच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जावा असं सावरकरांच्या उपस्थितीत ठरवण्यात आलं होतं… दरम्यान, आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सादर केलेलं ‘सीता स्वयंवर’ हे नाटक कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्यावरुन प्रेरित होतं..

मराठी रंगभूमीचा भारावून टाकणारा इतिहास हा गौरवशाली आहेच.. परंतु, १८४३ पासून रंगभूमीला एक नवी ओळख देणारं हे मनोरंजनाचं माध्यम चित्रपटांप्रमाणेच पुरुषांचं वर्चस्व असणारं होतं… ज्याकाळात महिला केवळ चुल-मुल यातच अडकल्या होत्या तेव्हा हिराबाई पेडणेकर यांनी रंगमंचावर पाऊल ठेवलं… २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडीत गायिका शेवंतुबाईंच्या पोटी हिराबाईंचा जन्म झाला… भीमाबाई, मैनाबाई आणि जिजीबाई या तीन बहिणींसोबत सावंतवाडित राहणाऱ्या शेवंतुबाई या देवदासी होत्या… गावात देवळात गायन-नृत्य करणाऱ्या शेवंतुबाईंच्या आकस्मिक निधनानंतर हिराबाईंनी मुंबई गाठली…

शिक्षण सुरु असलं तरी हिराबाईंचं गाणं बंद होणार नाही याकडे भीमा मावशीने काटेकोरपणे लक्ष दिलं… सिंधपुरीचा राजा जयद्थ, द्रोपदी आणि पांडव यांच्यावरील ‘जयद्रथ विडंबन’ हे हिराबाईंचं पहिलं नाटक…. त्यानंतर संगीत दामिनी आणि बऱ्याच नाटकांमध्ये त्यांनी कामं केली… परंतु, त्याकाळी फारसे नाटकाचे प्रयोग होऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या या नाटकांचं पुस्तकात रुपांतरण करण्यात आलं होतं…
================================
हे देखील वाचा : ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाला संगीत देणाऱ्या पद्मभूषण Ilaiyaraaja यांचा सुरेल प्रवास….
================================
दरम्यान, पु,ल.देशपांडे, विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, पुरुषोत्तम दारव्हेकर अशा अनेक दिग्गज नाटककरांनी रंगभूमीसाठी दिलेलं योगदान अमुल्य आहे… आणि आज त्यांच्याच लिखाणाचा वारसा पुढे घेऊन जात नवोदित कलाकार नव्या संहिता आणि काही जुन्या संहिता रंगमंचावर सादर करत आहेत… काही अंशी मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती; परंतु. रंगभूमीकडे कायमच प्रेक्षकांचा लोंढा ओढला जात होताच आणि तो आजन्म राहिल यात शंका नाही….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi