Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जो भी किया हमने किया Shaan से!

 जो भी किया हमने किया Shaan से!
बात पुरानी बडी सुहानी

जो भी किया हमने किया Shaan से!

by धनंजय कुलकर्णी 10/12/2025

१२ डिसेंबर १९८० या दिवशी मुंबईच्या मिनर्व्हा टॉकीजला पुन्हा एकदा सजवले गेले होते कारण या दिवशी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ हा चित्रपट इथे प्रदर्शित होणार होता. त्याच्या आधीच्या दिवशी ११ डिसेंबरला ‘शोले’ हा चित्रपट इथून उतरवला गेला होता. सलग पाच वर्ष एकाच थिएटरमध्ये मुक्काम केलेल्या ‘शोले’ ने जागतिक विक्रम तर केलाच होता पण रसिकांनी शेवटच्या दिवशी देखील भरघोस गर्दी थिएटरवर केली होती!  एका सिनेमाचा सूर्यास्त होत होता तर दुसऱ्याचा सूर्योदय होता का? कारण  रसिक प्रेक्षक ‘शान ‘ला दुसरा ‘शोले’ समजत होते. त्यामुळे या सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग फुल झाले होते. हा आलम फक्त मुंबईच्या मिनर्व्हा  थिएटरमध्येच नव्हता तर भारतातील तब्बल १५० हून अधिक थिएटरमध्ये होता. कलकत्यात तर ‘शान’चा बेसब्री से इंतजार होत होता. सर्वत्र ऍडव्हान्स बुकिंग ला तुफानी गर्दी होती. हाउसफुल चे बोर्ड सर्वत्र लागले होते.

================================

हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?

================================

या सिनेमाची मीडियामध्ये देखील प्रचंड हवा होती. ‘शोले’ या चित्रपटानंतर तब्बल साडे पाच वर्षांनी रमेश सिप्पी ‘शान’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यामुळे उत्सुकता तर प्रचंड होती. ‘शान’ या चित्रपटाची स्टार कास्ट जबरदस्त होती. अमिताभ बच्चन, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, परविन बाबी, बिंदिया गोस्वामी, जॉनी वॉकर, कुलभूषण खरबंदा, मजहर खान आणि  सुनील दत्त!  असे तोलामलाचे कलाकार या चित्रपटात होते. ‘शान’चा पहिला आठवडा जबरदस्त गेला. पण दुसऱ्या आठवड्यापासून मात्र प्रेक्षकांची गर्दी कमी होऊ लागली. तीन आठवड्यानंतर तर  हाउसफुल चे बोर्ड सगळीकडे हटवले गेले आणि शान हा सिनेमा फ्लॉप झाला अशी आवई सगळीकडे उठवली होती. खरोखरच असं झालं होतं का? ‘शोले’ या  सिनेमाचे  देखील सुरुवातीला स्वागत अतिशय थंड झाले होते. पण नंतर एक महिन्यांनी जोर पकडला गेला. इथे मात्र उलट झालं होतं. पहिले दोन-तीन आठवडे प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर ‘शान’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

या अपयशावर भरपूर चर्चा त्या काळात आणि आजही होत असते. टॉप टेन फ्लॉप सिनेमात या सिनेमाचा उल्लेख होतो.  रमेश सिप्पी  यांनी जेव्हा ‘शोले’ या चित्रपटानंतर तितकाच भव्य दिव्य असा चित्रपट निर्माण करायचे ठरवले तेव्हा मेहनत आणि पैसा यातकाहीही कसूर केली नाही. पाण्यासारखा पैसा खर्च केला. सुरुवातीला सिनेमाची स्टार कास्ट त्यांनी बऱ्यापैकी ‘शोले’ चीच  ठेवली होती. धर्मेंद्र, अमिताभ, संजीव कुमार, विनोद खन्ना ,हेमामालिनी ही ‘शान’ ची ओरिजनल स्टार कास्ट होती. पण त्या नंतर धर्मेंद्रने चित्रपटातून स्वतःला बाजूला केलं सोबत तो हेमा मालिनीला देखील घेऊन बाहेर पडला. संजीव कुमारला या चित्रपटातील खलनायक शाकाल रंगवायचा होता पण सिप्पी यांनी त्याला सुनील दत्तची भूमिका ऑफर केली होती. त्यामुळे तो देखील बाहेर पडला.

विनोद खन्ना या चित्रपटात शत्रुघन सिंहची भूमिका करणार होता पण ओशो रजनीश कडे गेल्यामुळे ती भूमिका शत्रुघन सिन्हा कडे  आली. रमेश सिप्पी  यांनी ‘शोले’ च्या तुलनेत ‘शान’ हा टोटली वेगळा सिनेमा केला होता. ‘शोले’ या सिनेमाला भारतीय ग्रामीण चेहरा होता पण शान टोटली वेस्टर्णाइज लुक असलेला सिनेमा होता. इथला खलनायक हा जेम्स बॉण्डच्या सिनेमातील विलन सारखा टेक्नोसॅव्ही होता. त्या काळात जगभर जेम्स बॉण्डच्या सिनेमाचा मोठा बोलवाला होता. रमेश सिप्पी  यांनी ‘शान’ बनवताना शहरी प्रेक्षक वर्ग समोर  ठेवला होता. यातील खलनायक शाकालची भूमिका त्यांनी हॉलिवूडच्यासिनेमा सिनेमा उचलली होती. चकाचक लोकेशन्स, प्रचंड मोठे सेट्स, जबरदस्त स्टार कास्ट….

================================

हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!

================================

सिप्पी यांनी  कुठे ही काहीही  तडजोड केली नव्हती. पाण्यासारखा पैसा यात ओतला होता. त्या काळात या सिनेमाचे बजेट तब्बल सहा कोटी रुपये होते. चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते. किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले, उषा उथप  यांनी सिनेमातील गाणी गायली होती. सिनेमातील  गाणी ‘शोले’ च्या तुलनेने उजवी  बनली होती. एकूणच ‘शान’ हा चित्रपट जबरदस्त बनला होता. मग बिघडले कुठे? एकतर शोले शी थेट तुलना हेच या सिनेमाच्या सो  कॉल्ड अपयशाचे प्रमुख कारण म्हटले पाहिजे. कारण ‘शान’ चा जर तुम्ही स्वतंत्र विचार केला तर तो कधी कधी शोले पेक्षाही ग्रेट वाटतो!

१९८०  या वर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर जर नजर टाकली तर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता फिरोज खानचा ‘कुर्बानी’. दुसऱ्या क्रमांकावर जे ओम प्रकाश यांचा ‘आशा’ हा चित्रपट होता. तिसऱ्या क्रमांकावर विजय आनंद दिग्दर्शित ‘राम बलराम’ चौथ्या क्रमांकावर राज खोसला दिग्दर्शित ‘दोस्ताना’ आणि पाचव्या क्रमांकावर रमेश सिप्पी यांचा ‘शान’ हा चित्रपट होता. कदाचित बॉक्स ऑफिसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे की टॉप फाईव पैकी असलेल्या चित्रपटाला फ्लॉप घोषित केले गेले.

याचे कारण सहा कोटी रुपये बजेट असलेल्या शान ने पहिल्या रनला 12 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. शोले या चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये होते आणि त्याने तब्बल 30 कोटी रुपयांच कलेक्शन केले होते! बजेटच्या तुलनात्मक नजरेतून पाहिले तर ‘शान’ ने कलेक्शन कमी केले होते. पण ‘शान’ हा चित्रपट ऐंशी आणि नव्वदच्या दशकात री रिलीज होऊन चांगले कलेक्शन करत होता. नव्वद च्या दशकामध्ये केबल कनेक्शन त्यानंतर सॅटेलाईट कनेक्शन यातून या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. २००५  साली  तर ‘शान’ या चित्रपटाचे डिजिटल वर्जन देखील प्रदर्शित झाले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood retro news bollywood update Celebrity Dharmendra Entertainment Entertainment News Hema Malini kurbani movie shaan movie Shatrughan Sinha
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.