मन्नत खरेदी केल्यानंतर शाहरुखकडे १ रुपयाही राहिला नाही…
शाहरुखचा वाढदिवस असला की गर्दी कुठे जमते? तर मन्नत(Mannat). चाहते शाहरूखची एक झलक बघायला तासनतास कुठे ताटकळत राहतात? तर मन्नतसमोर. शाहरुखचा एखादा पिक्चर येत असेल तर प्रमोशनचा केंद्रबिंदू काय असतो? तर मन्नत. कित्येक सामान्य माणसांचंच नव्हे तर नेत्या,अभिनेत्यांचं त्यांच्या स्वप्नातील घर कसं आहे? तर मन्नतसारखं. शाहरुखविषयी चर्चा कुठलीही का असेना, मन्नतचा उल्लेख आढळतोच. शाहरुखची कुठलीही गोष्ट मन्नत शिवाय अपूर्णच राहते. गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेचा केंद्रबिंदू बनून गेलेल्या शाहरुखच्या घराच्या खरेदीची गोष्ट देखील तेवढीच रंजक आहे.(Mannat)
गौरी शिंदे, शाहरुखची पत्नी हिचे पहिले पुस्तक ‘My Life in Design’ नुकतेच प्रकाशित झाले. या प्रकाशन सोहळ्याला खुद्द शाहरुख उपस्थित होता. यादरम्यानच विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शाहरुखने मन्नत कसा घेतला याचा किस्सा सांगितला.
शाहरुख मुळचा दिल्लीचा. दिल्लीतील लोकांना ऐसपैस बंगल्यात राहण्याची सवय असल्याने शाहरुखच्या अंगीदेखील तो मोकळेपणा येणे साहजिकच होते. मुंबईत आल्यानंतर मात्र येथील जीवनशैली, महागाई यामुळे बंगल्यांत राहणे येथील लोकांच्या स्वभावात नाही हे त्याच्या लक्षात आले. परंतु स्वतःचं घर, विशेषता छानसा बंगला असावा, हे स्वप्न तो बाळगून होता.
ताज हॉटेल जवळच असणाऱ्या आपल्या दिग्दर्शक मित्राच्या बंगल्यात तेव्हा शाहरुख राहत असे, जेव्हा त्याला मन्नत विषयी कळलं. बंगला बघून आल्यानंतर त्याने तो खरेदी करायचं ठरवलं. अर्थातच आज जे मन्नतचं (Mannat) रूप आहे ते त्यावेळी तसं नव्हतं, परंतु आहे त्या अवस्थेत शाहरुखला मन्नत (Mannat) आवडला आणि आपण हा बंगला घ्यायला हवा, त्याने ठरवलं.
एवढा महागडा बंगला करियरच्या सुरुवातीला खरेदी करणे हे फार जोखमीचे काम होते. शाहरुखकडे येण्या अगोदर हा बंगला सलमान खानकडे खरेदीसाठी गेला होता, परंतु वडील सलीम खान यांनी सलमानला एवढा महागडा बंगला खरेदी करण्यापासून रोखले. शाहरुखने शेवटी हा बंगला खरेदी केला.
एवढा महागडा बंगला खरेदी केल्यानंतर त्याला सजवायला, फर्निश करायला मात्र शाहरुखकडे पैसे उरलेच नाहीत. एखाद्या डिझायनरला सांगून बंगला डिझाईन करून घेण्याएवढे देखील पैसे त्यावेळी शाहरुखकडे उरले नव्हते. अशात आपली पत्नी गौरीलाच त्याने ते घर डिझाईन करायला सांगितले. त्यांनतर हळूहळू बरेच दिवस, जसजसे पैसे येतील तसं त्यांनी मन्नतला (Mannat) डिझाईन करण सुरू ठेवलं आणि आज जे रूप बंगल्याला आहे, ते आणलं.
====
हे देखील वाचा : अभिनेत्री परिणीती चोप्राचा नवरा आहे तरी कोण?
====
आजच्या घडीला शाहरुखच्या मन्नतची (Mannat) किंमत जवळपास दोनशे कोटीच्या घरात आहे. २७००० स्क्वेअर फूटच्या परिसरात पसरलेला मन्नतच्या डिझाईनमध्ये आधुनिक त्याचबरोबर विन्टेज छटा देखील आढळतात. अशा रंजक पद्धतीने स्वतःजवळील सगळे पैसे घालवत शाहरुखने मन्नत खरेदी केला होता.