Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Shah Rukh Khan : ‘मन्नत’मध्ये फोनवर बोलण्यास मनाई?
किंग खानचे जगभरात चाहते आहेत. गेले अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीवर तो राज्य करतोय. बरं जितकी चर्चा शाहरुखच्या (Shah rukh Khan) चित्रपटांची असते तितकीच त्याच्या मन्नत या घराची असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुख खानचं घर बघायला लोकं येतात. शाहरुखचं घर ‘मन्नत’ खूप आलिशान आहे. अशातच ‘मन्नत’मध्ये शाहरुखने एक खास नियम केला आहे; तो म्हणजे घरात फोनवर बोलण्यास बंदी आहे. काय आहे कारण जाणून घेऊयात…(Bollywood update)

शाहरुख खान (Shah Rukh Khan) एकतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना दिसत नाही. आणि जरी आला तरी तो कायम आपल्या कुटुंबासोबतच असतो. आणि त्यावेळी तो मुलगी सुहाना (Suhana Khan) किंवा मुलगा अबराम सोबत असताना त्यांची प्रायव्हसी टिकून राहिल याची खबरदारी घेताना तो दिसतोच. अशातच आता शाहरुखने मन्नतमध्ये फोन वापरण्यावर बंदी घातल्याचं समजतंय. संपूर्ण कुटुंबाला एकमेकांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी शाहरुख आणि गौरीने (Gauri Khan) घरी असताना कमीत कमी फोन वापरण्याचा नियम आखला आहे. कुटुंबाच्या वैयक्तिक वेळात कुठलीच अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे. (Entertainment news)
===========
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
===========
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहरुखचं (Shah Rukh Khan) ‘मन्नत’ घर रिनोव्हेशनला जाणार अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे आता लवकरच शाहरुखच्या घराचा अजून आलिशान कायापालट होणार असं दिसून येतंय. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटात दिसणार असून यात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) असतील असं सांगतिलं जात आहे. याशिवाय, ‘Tiger vs Pathaan’ हा चित्रपट देखील लवकरच येणार आहे. (Bollywood movies)