
Shah Rukh Khan : २०० कोटींचा मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहणार!
किंग खान शाहरुख खान याने हिंदीतच नव्हे तर जगभरात स्वत:चे विश्व तयार केले आहे. जितकी त्याच्या चित्रपटांची चर्चा असते तितकीच चर्चा त्याच्या मन्नत बंगल्याची असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुखचे चाहते मन्नत बंगला पाहण्यासाठी, बंगल्याबाहेर एक फोटो काढण्यासाठी येत असतात. पण आता किंग खान मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. नेमकं झालंय तरी काय? (Shah rukh Khan)
तर, मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे रिनोव्हेशन होणार असल्याकारणाने शाहरुख कुटुंबासह बांद्र्यातच घर भाड्याने घेऊन काही महिन्यांसाठी राहणार आहे. शाहरुखने पाली हिलमध्ये जॅकी भगनानी (Jacky bhagnani) आणि त्याची बहीण दीपशीखा यांच्याकडून ‘पूजा कासा’ या इमारतीत दोन लक्झरी डुप्लिक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले असून निर्माते वाशू भगनानी (vashu bhagnani) यांनी ती इमारत उभारली आहे.(Mannat mansion)

दरम्यान, शाहरुखच्या मन्नत बंगल्याबद्दल मिळालेल्या एका अहवालानुसार, मन्नतच्या रिनोव्हेशनचे मे २०२५ मध्ये सुरू होईल. यामध्ये, बंगल्याचे काही भाग वाढविले जाणार असून शाहरुखने बंगल्याच्या वाढीसाठी कोर्टाकडून परवानगी देखील घेतली आहे. किंग खानचा मन्नत बंगला प्रत्यक्षात ‘ग्रेड III’ हेरिटेज प्रॉपर्टीच्या श्रेणीखाली येत असल्यामुळे त्याच्या रचनेत कोणतेही बदल करण्यापूर्वी कोर्ट आणि नगरपालिका (बीएमसी) कडून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. (Bollywood update)
===========
हे देखील वाचा :‘हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही…..’
===========
शाहरुख (Shah rukh khan) ‘पूजा कासा’ इमारतीत तब्बल महिन्याला २४ लाख रुपये भाडे देऊन राहणार आहे.’जॅपकी’ डेटा विश्लेषक कंपनीने नोंदवले की शाहरुख खानच्या ‘रेड मिरची’ कंपनीने पाली हिलच्या ‘पूजा कासा’ बिल्डिंगमध्ये दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले असून दोन्ही अपार्टमेंटसाठी १४ फेब्रुवारीला लीव्ह एण्ड लायसन्स एग्रीमेंटवर सही करण्यात आलीये. दरम्यान, मन्नतचे काम पुर्ण होण्यास कालावधी किती लागेल याचा अंदाज नसल्यामुळे जॅकी भगनानी आणि दीपशीखा यांच्याशी शाहरुखने ३६ महिन्यांसाठी करार केला आहे. (Gauri Khan)